Breaking News

1/breakingnews/recent

केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे,आत्मचिंतन करा; फडणवीसांचा सल्ला

No comments


मुंबई -

देवेंद्र फडणवीस म्हणतात की आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. आताही सवय सोडा. कधी तरी आत्मचिंतन करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारला दिला आहे. कोपरगाव येथे 40 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. त्यांनी कधी तरी आत्मचिंतन केले पाहिजे. कधी काय करावं याचा विचार सरकारने केला पाहजे, असे सांगतानाच आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचे असते, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.  चांगलं झाले आपली पाठ थोपटून घेतात. पण त्यात काही उणीव दिसली की लगेच केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकारचे असे वागणे बरे नाही, असे चिमटा त्यांनी काढला.

पीकविम्यावरून सरकारवर टीका

यावेळी त्यांनी पीकविमा योजनेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने सुरुवातीला टेंडर काढले नाही. उशिरा टेंडर काढले. त्यामुळे काही जिल्ह्यात टेंडरच झाले नाही. फळबागा संदर्भात यांनी अनेक निकष बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तिथे मदत मिळाली नाही. या संदर्भात गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि टेंडरही वेळेत गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

आंबेडकरांना टोला

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मात्र मी ते काम कधीच सुरू केलं आहे. नागपूरला थांबून जे करायचे आहे, ते आधीच केलं. ऑक्सिजनचा साठा कमी होता, तो आणला आहे. विविध सेवाही सुरू केल्या आहेत. आम्ही जे काही केलंय, ते कदाचित आंबेडकरांपर्यंत पोहोचले नसेल. त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोहोचवू, असं त्यांनी सांगितलं.

गेल्यावर्षी वादळामुळे मोठं नुकसान

मागच्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात मोठं नुकसान झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने घोषित केलेली रक्कम नुकसानग्रस्तांना पोहोचली नाही. ही मदतही तुटपुंजी होती. मागच्या वर्षी वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या होत्या. यावेळी वादळात कमी नुकसान होईल, अशी अपेक्षा करुयात, असंही ते म्हणाले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *