Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - शिक्षकांनी उभारले ऑक्सिजन कोविड केअर सेंटर

No comments

 News24सह्याद्री -  शिक्षकांनी उभारले ऑक्सिजन कोविड केअर सेंटर....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES


1. ३०० बेडच्या स्व.वसंतराव झावरे पाटील कोवीड सेंटरची सुरुवात
पारनेर तालुक्यातील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी जि .परिषदेचे  मा. उपाध्यक्ष सुजित  झावरे यांनी स्व. मा. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या नावाने ३०० बेड्चे अद्यययावत  कोवीड सेंटर सुरु करण्यात आले असून आज पासून या सेंटर मध्ये रुग्ण दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

2. शेवगांव येथील डॉ विकास बेडके बनले कोरोना रुग्णांसाठी देवदूत
शेवगांव तालुक्यातील अथर्व हॉस्पिटलचे संचालक डॉ विकास बेडके मात्र कोरोना रुग्नासाठी महत्वाची भूमिका बजावत देवदुता प्रमाणे ते सर्वांच्या कामी येत आहेत. शेवगांव तालुक्यातील फलकेवाडी येथील मोहन फलके यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा स्कोर देखील २१ पर्यंत गेला. बीपी, शुगर असलेल्या या क्रिटीकल
पेशंटला कुणीही घेण्यास तयार नसताना मनवता आणि डॉक्टरकीचा धर्म समोर ठेवुन शेवगाव मध्ये स्थीत असलेल्या अथर्व हॉस्पिटलचे संचालक डॉ विकास बेडके यांनी त्यांना गॅरंटी नसताना ॲडमिट करून घेतले. 
3. जामखेडच्या आरोळे हॉस्पिटलमध्ये होणार 'एक्स-रे' सुविधा उपलब्ध
जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.या रुग्णांच्या आरोग्यसाठी लागणाऱ्या वैद्यकीय साधनांची गरजेनुसार पूर्तताही करण्यात येत आहे. आ.रोहित पवार यांच्या माध्यमातुन आता या हॉस्पिटलमध्ये 'डिजिटल एक्स-रे' मशीन उपलब्ध करण्यात येत असुन त्यासोबतच दोन वैद्यकीय कर्मचारी हे काम पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.

4. जनता कर्फ्यु लागू केल्या नंतर  शहरातून रुट मार्च
पाथर्डी तालुक्यात आज पासून जनता कर्फ्यु लागू केल्या नंतर आज सकाळी महसूल, पोलीस व पालिका प्रशासनाने संपूर्ण पाथर्डी शहरातून रुट मार्च काढत नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन केले, रूट मार्च ला नाईक चौकातून सुरुवात करण्यात आली.

5. लसीकरणासाठी तुफान गर्दी
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात 6 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना प्रथम लस देण्यात येत असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधीत लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती,यावेळी सोशल डिसनसिंगचे नियम पायदळी तुडवले गेल्याच चित्र पहावयास मिळालं,यावेळी गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोहचलेल्या आरोग्य सहाय्यकास धक्काबुक्की झाल्याचे माहिती ग्रामीण रुग्णालयाचे सचिन जोशी यांनी दिली आहे

6. खा.सुजय विखे कार्यकर्त्यांचा जल्लोष
राम्डेसिवीर इंजेक्शन प्रकरणात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात करण्यास  औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे औरंगाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने लोणीत खासदार सुजय विखे यांच्या  कार्यकर्त्यांने जल्लोषात आनंदोस्तव साजरा केला

7. शिक्षकांनी उभारले ऑक्सिजन कोविड केअर सेंटर
अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी एक आदर्श काम केलाय ज्ञानदान देणाऱ्या शिक्षकांनी एकत्र येत जणू जीवदान देण्याचा विडाच   उचललाय अतिदुर्गम असलेल्या अकोले तालुक्यामध्ये सर्वत्र कोरोनाने हात पाय पसरले अस्या परिस्थिती मध्ये ऑक्सिजन बेड मिळवणं कठीण झालं होत हीच अडचण लक्सात घेत शिक्षकांनी ३० लाख रुपय एकत्र केले आणि ७० ऑक्सिजन बेड च सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु केल
  
8. राज्यशासन न्यायालयात  बाजू मांडण्यासाठी अपयशी  -  मा.  जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे
 मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं  मराठा आरक्षण रद्द ठरविलं आहे या प्रकरणी
 माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी  मराठा आरक्षण विषयी न्यूज २४ सह्याद्रीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

9. ग्रामीण रुग्णालयात लसीकरण दरम्यान राडा
राहुरी तालुक्यातील तहाराबाद ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण प्रसंगी ग्रामस्थां आणि  आरोग्य विभागामध्ये चांगलीच खडाजंगी व दमबाजी झाल्याची घटना घडली गावाबाहेरील लोकांना लसीकरण करू नका फक्त गावातीलच लोकांना लसीकरण करण्यास प्राधान्य द्या या मुद्यावरून स्थानिक नागरिक व आरोग्य विभाग अधिकारी यांच्यामध्ये ही चकमक घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळते
  
10. स्वच्छता कामगारांचे पगार देता येत नसेल तर राजीनामा द्या  
नगरपंचायतने स्वछता कर्मचार्‍यांचे 4 महिन्याचे पगार थकवल्यामुळे शिर्डी महाविकास आघाडीच्यावतीने सत्ताधारी भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना जाब विचारत थकीत कामगारांचे पगार देता येत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *