Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - दिग्दर्शक महेश कंद यांच्या 'कंदील'चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज

No comments

News24सह्याद्री दिग्दर्शक महेश कंद यांच्या 'कंदील'चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES


1. दिग्दर्शक महेश कंद यांच्या 'कंदील'चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज
''हातात घेऊन सपनाची भिंग निघाले.... बघाया सशाचे शिंग... पोरांना चढली श्रीमंतीची झिंग'' या वनलाईनवर आधारलेला एक नवा कोरा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 'कंदील' असं शीर्षक असलेला हा चित्रपट 19व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये  निवडला गेला असून . महेश कंद या नवोदित दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला 'कंदील' देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये हजेरी लावणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2. कोरोना संकटावरून अनुपम खेर केंद्र सरकारवर बरसले!
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी बनून आलीय. सरकारचे अनेक प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. संक्रमितांची संख्या आणि कोरोना मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. अशात आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तगडा सल्ला दिला आहे. या अशा काळात इमेज बनवण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवणे अधिक गरजेचे आहे.

3. पवित्र रिश्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांची लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी अर्चना-मानवच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या दोघांना या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली होती. आता पुन्हा एकदा पवित्र रिश्ता मालिकेचा दुसरा भाग डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

4. रुके ना तू,- म्हणत अमिताभ बच्चन यांनी केलं  =आवाहन,
कोरोना च्या या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावलेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत २ कोटी रुपये दान केले होते आणि आता ते लोकांना या संकटात एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ते प्रसून जोशी यांची कविता ''रुके ना तू... सादर करत लोकांना या संकटासमोर हार मानू नका असे सांगत आहेत. 

5. व्हॅक्सिनेशनचा फोटो टाकून ट्रोल झाली गोविंदाची भाची
अलीकडेच अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम आरती सिंग  ने कोरोनाची लस घेतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि त्यात आरती सिंगने लिहिले की, ''तिला इंजेक्शनची भीती वाटते पण आपल्याला याच्याशी लढण्याची गरज आहे. पहिला डोस घेतला.''


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *