शहराची खबरबात - महापालिका दक्षता पथकाने केला लाखो रुपयांचा दंड वसूल
News24सह्याद्री - महापालिका दक्षता पथकाने केला लाखो रुपयांचा दंड वसूल... पहा शहराची खबरबात मध्ये
1. महापािलका दक्षता पथकाकडून ५.३० लाख रुपयांचा दंड वसूल
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत नगर शहरात ५ लाख ३० हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई महापालिकेच्या चार पथकांनी केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात दक्षता पथक गठीत करण्यात आले आहेत.आतापर्यंत ४८९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई मास्क न वापरणारे, गर्दी करणारे नागरिक व दुकानदारांवर करण्यात आली आहे.
2. पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी
मद्यप्राशन करून कर्तव्य बजावत असलेल्या शहरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे या चौकशीत ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे जिल्हा पोलिस दलातील अधिकारी कर्तव्य बजावत असताना मद्यप्राशन करून आला होता या प्रकारची माहिती पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजली त्यांनी तात्काळ या अधिकाऱ्याची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली अधिकाऱ्यांची सध्या खातेनिहाय चौकशी सुरू आहे.
3. तौक्ते वादळामुळे सोसाट्याचा वारा
अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यात उमटले शनिवारी मध्यरात्रीपासूनच सोसाट्याचा वारा घोगावत होता रविवारी दिवसभर जोराचा वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता तर शहरात आज ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा वाहत आहे
4. 'कोविशिल्ड'च्या दुसऱ्या डोसबाबत महानगरपालिकेचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार आता नगर महापालिकेने लसीचा दुसरा डोस पहिल्या दोसला किमान 80 दिवस पूर्ण झाल्यानंतरच देण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे covyaxin चा दुसरा डोस लस उपलब्धतेनुसार दिला जाणार आहे.
5. महागाई विरोधात आंदोलन
देशातील नागरिक एकीकडे कोरोनाशी सामना करत असतानाचा दुसरीकडे महागाईशी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थिती मध्ये सुद्धा केंद्र सरकार वारंवार महागाई मध्ये वाढ करून सर्वसामान्य माणसाचे जनजीवन विस्कळित करण्याचे काम करत आहे. केंद्र सरकार वारंवार पेट्रोल, डिझेल, गॅस यांची भाववाढ करत आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे?.
No comments
Post a Comment