शहराची खबरबात - नगर बाजार समितीमधील निर्बंध कायम
News24सह्याद्री - नगर बाजार समितीमधील निर्बंध कायम... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. एटीएम कार्डद्वारे फसवणारी टोळी जेरबंद
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना लोकांकडून एटीएम स्वाईप करून एटीएम पिन नंबर विचारात खोट एटीएम कार्ड बनवून पैसे काढत फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात आल आहे. भिंगार कॅम्प आणि सायबर पोलिसांनी ही कारवाई करत दोन आरोपींना अटक करण्यात आलंय। सुरज मिश्रा आणि धीरज मिश्रा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या आरोपींकडून २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२. नगर बाजार समितीमधील निर्बंध कायम
महापालिकेने नगर शहरात शिथिल केलेले निर्बंध अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ठोक व्यावसायिक दुकाने, भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांना लागू राहणार नाही। मार्केट यार्ड मधील दुकान 1 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत असे आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी काढले आहेत। बाजार समितीच्या आवारात भाजीपाला फळांचा बाजार सुरू राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
३. म्युकर मायकोसिस आजाराचा नगर जिल्ह्यात शिरकाव
जिल्ह्यात म्युकाेर मायकाॅसिस आजाराच्या 61 रुग्णांची नाेंद झाली आहे. या रुग्णांवर नगर शहरातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल बाेरगे यांनी या माहितीला दुजाेरा दिला. त्याचबराेबर जिल्हा रुग्णालयाकडे 8 रुग्णांची नाेंद आहे. त्यातील दाेघांचा काेराेना संसर्गामुळे मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा यांनी दिली. काेराेना संसर्गापाठाेपाठ म्युकाेरमायकाॅसिस आजाराने नगर जिल्ह्यात डाेके वर काढले आहे. नगर शहरातील खाजगी रुग्णालयांकडून महापालिकेने म्युकाेरमायकाॅसिस आजारावर उपचार घेणाऱ्यांची माहिती आज गाेळा केली.
४. एसटी महामंडळाची उपमहाव्यवस्थापकांकडे तक्रार
एसटी महामंडळाच्या नगर विभागांमध्ये 2016 - 17 मध्ये झालेल्या कर्मचारी भरती मध्ये आरक्षणाचा चुकीचा अर्थ लावल्याने 40 ते 45 कर्मचाऱ्यांना सध्या नियमित वेतन श्रेणी पासूनमुकाव लागल आहे. त्यामुळे त्यांनी या विरोधात थेट एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापकांकडे तक्रार करून पुढील महिन्यात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
५. ऑक्सीजन बेडसाठी मनपाने मागवल्या निविदा
महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर मध्ये आता ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होणार असून पहिल्या टप्प्यात आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची लाईन बसवण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत। कार्यारंभ आदेश देऊन तातडीने काम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलय. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.
No comments
Post a Comment