कुठे कोणता मास्क कसा घालावा,वाचा
News24सह्याद्री -
कोरोनाच संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाची पहिली लाट असो किंवा दुसरी, याविरुद्ध लढा देण्यासाठी मास्कने शस्त्राप्रमाणे काम केले आहे. मास्क घातल्यानंतर आजही अनेकजण तक्रारी करताना दिसताय. जसे की, मास्क घातला की श्वास घेण्यास अडथळा येतो, चालताना धाप लागते. मात्र ही लहान समस्या आहे. कोरोनाचा संसर्ग होण्यापेक्षा त्यापासून बचाव होण्यासाठी मास्क घालणं हा सोयिस्कर पर्याय आहे. करोना महामारीच्या जीवघेण्या परिस्थितीत, मास्कसारखे शस्त्र कधी, कुठे आणि कसे वापरावे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
साधारण हा प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात असेल की, बाहेर पडताना कॉटन मास्क, सर्जिकल मास्क वापरावं की अजून कोणता वेगळा मास्क योग्य राहिल? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, घराबाहेर पडताना छ95/घछ95 किंवा सर्जिकल मास्क वापरावे. गर्दीच्या ठिकाणी डबल मास्क घातले तर नाक आणि तोंडाद्वारे करोनाचे विषाणू शरीरात जाण्यापासून रोखण्यास मदत होते. हॉस्पिटल, फॅक्टरी, कार्यालयात किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असाल तर चेहरा दुहेरी मास्क लावून सुरक्षित ठेवा. ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी असेल किंवा जे हॉटस्पॉट नाही अशा ठिकाणी तुम्ही सिंगल मास्क घालू शकतात. अशा वेळी तुम्ही कॉटन मास्क किंवा सर्जिकल मास्क देखील घालू शकतात.
No comments
Post a Comment