६ मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - भारतीय क्रिकेटपटूचे 36 व्या वर्षीच कोरोनामुळे निधन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
१ देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का?
देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून दैनंदिन रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. परिस्थिती बिघडू लागल्याने अनेक राजकीय नेते आणि तज्ञ मोदी सरकारला देशात लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत आहे.
२. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचंही राहुल गांधींना समर्थन
देशात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. देशातल्या वैद्यकीय यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडाही भासू लागला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता लॉकडाउन हा एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या या भूमिकेला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही संमती दर्शवली आहे.
३. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या नागरिकांना घातली बंदी
भारतात करोनामुळे विदारक स्थिती निर्माण झाली आहे. भारतात वाढत असलेल्या करोना संकटाचा इतर देशांनी धसका घेतला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या नागरिकांना बंदी घातली आहे. आता त्यात शेजारी असलेल्या श्रीलंकेची भर पडली आहे.
४. गायींसाठी राज्यात मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. कुठे ऑक्सिजन तर कुठे रेमडेसिवीर सारख्या जीवनावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील करोना काळात गायींच्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
५. केरळमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
केरळमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात ८ मे ते १६ मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. केरळमध्ये बुधवारी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी राज्यात ४१ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.
६. आता ऑक्सिजन पुरवठा कमी करू नका – केजरीवाल
करोनामुळे संपूर्ण देश त्रस्त आहे. आशातच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्य सरकार केंद्राकडे मागणी करत आहेत. दिल्ली सरकारने केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी केली होती. दरम्यान, केंद्राने 730 टन ऑक्सिजनचा पुरवठा केलाय . त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून पहिल्यांदाच दिल्लीला 700 टन पेक्षा जास्त ऑक्सिजन दिल्याबद्दल आभार मानलेत.
७. सात किलो युरेनियमसहीत मुंबईमधून दोघांना अटक
महाराष्ट्रातील दहशतवादीविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली असून या दोघांकडे तब्बल सात किलो युरोनियम आढळून आलय . युरेनियम खरेदी करन्यासाठी कोणी तयार होत आहे का... याचा शोध दोन्ही आरोपी घेत असतानाच एटी एसने त्यांच्यावर छापा टाकून हे युरेनियम जप्त केलय.
८. करोनाबाधित रुग्णांना लूटणारी टोळी सक्रिय
करोनाबाधित रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना संगनमताने लुटण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात वाढू लागल्यानंतर पोलीस आणि महापालिका यंत्रणा सक्रीय झाली आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा या साखळीत सहभाग असल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. ‘
९. यादी झळकणार ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर
करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहापूर तालुक्यातील प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना वारंवार देऊनही अनेकजण करोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. करोना आटोक्यात यावा त्याचा फैलाव होऊ नये यासाठी करोनाचे नियम न पाळणाऱ्या ग्रामस्थांची आता ‘सामाजिक आरोग्य शत्रू व करोना मित्र’ म्हणून नोटीस बोर्डावर जाहीर प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
१०. भारतीय क्रिकेटपटूचे 36 व्या वर्षीच कोरोनामुळे निधन
देशात कोरना व्हायरसच्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या चार क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यातच भारतीय क्रिकेटला कोरोनामुळे आणखी एक धक्का बसला आहे.
No comments
Post a Comment