अल्लू अर्जुनने केली कोरोनावर यशस्वी मात; तो १५ दिवसानी भेटला कुटूंबियांना
मुंबई -
कोरोनाच थैमान दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे त्यात आता साऊथचा सुपरस्टार’ अल्लू अर्जुन काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या जाळ्यात सापडला होता. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती त्याने स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. ही बातमी ऐकून त्याचे चाहते आश्चर्यचकीत झाले होते. पण आता सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुनने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नुकताच त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे.
कोरोना झाल्याचे कळताच सुपरस्टार अल्लू अर्जुन १५ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये गेला होता. १५ दिवसानंतर आपल्या घरी सुखरूप परतला आहे. १५ दिवस आयसोलेशनमध्ये राहिलेल्या अल्लू अर्जुनने कोरोनावर मात केल्यानंतर एक व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये १५ दिवसानंतर अल्लू अर्जुन आपल्या घरी मुलांना भेटण्यासाठी जाताना दिसतोय. अल्लू अर्जुन लिफ्टमधून बाहेर पडताच त्याचा मुलगा आनंदाने त्याच्या गळ्यात पडून मिठी मारताना दिसून येत आहे. त्यानंतर त्याची मुलगी ही त्याच्याजवळ येते आणि गळ्यात पडते. आपले वडील कोरोनातून बरे होऊन घरी सुखरूप आले आहे, याचा आनंद या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हे पाहून अल्लू अर्जुनही त्याच्या मुलांसोबत खेळू लागतो.
हा व्हिडीओ शेअर करताना सुपरस्टार अल्लू अर्जुनने एक कॅप्शन ही लिहिली आहे. यात त्याने लिहिलंय, “माझ्या कुटूंबियांना १५ दिवसानंतर भेटतोय….करोना निगेटिव्ह आलो आहे…आणि १५ दिवसांचा क्वारंटाइन ही संपलाय…मला माझ्या मुलांची खूप आठवण येत होती…मी बरा होण्यासाठी प्रार्थना करणारे माझे चाहते आणि हितचिंतकांचे खूप खूप आभार…”
सुपरस्टार अल्लू अर्जुन आता लवकरच ‘पुष्पा’ चित्रपटात झळकताना दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर आधीच प्रदर्शित करण्यात आलाय. परंतू, चित्रपटाची शूटिंग अजुनही सुरूच आहे. या चित्रपटाची बरीचशी शूटिंग पूर्ण झालेली आहे. परंतू सध्याच्या करोना परिस्थितीमुळे उर्वरित शूटिंगसाठी अडचणी आल्या आहे.
No comments
Post a Comment