Breaking News

1/breakingnews/recent

जयंत पाटील नाराज?; अजित पवारांनी सोडलं मौन

No comments



मुंबई -

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावल्याने नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मुख्य सचिव कुंटे यांच्या पाटील नाराज असल्याचे बोलले जात असून, वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडली असल्याचे बोलले गेले आहे. या संपूर्ण वादावर मौन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. याबैठकीत कोरोना उपाययोजना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांना जयंत पाटील नाराज असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांचे उत्तर 

अजित पवार म्हणाले, “एक मिनिटे… हे माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात असेल, तर त्याचं उत्तर जयंत पाटीलच देतील. जयंत पाटील खूप वरिष्ठ नेते आहे. अनेक वर्ष त्यांनी राज्याचे अर्थ मंत्रालय सांभाळले. गृह मंत्रालय सांभाळले. ग्रामविकास मंत्रालय सांभाळले. आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात. त्यांच्या कामाची पद्धत बघितली, तर ते अतिशय शांत स्वभावाचे आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेणारे आहे. उलट जरा तापट स्वभावाचा कडक बोलणार मीच आहे. ते तर एकदम माझ्याविरुद्ध आहे. या बातम्या कशा आल्या, कधी आल्या माहिती नाही. ज्याला महत्त्व द्यायला नको, त्यालाच आपण महत्त्व देतो. त्यामुळे लोकांच लक्ष तिकडे जाते. माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की, यामध्ये काही तथ्य नाही. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच मुख्य सचिव आणि अधिकारी. आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाही, अनेक वर्ष आम्ही प्रशासन चालवले आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *