Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगर शहरावरील कचर्‍याचा भार पुन्हा झाला हलका

No comments

   News24सह्याद्री - नगर शहरावरील कचर्‍याचा भार पुन्हा झाला हलका..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. शहरात दोन दिवसात सव्वा लाखांचा दंड वसूल
शहरात लॉकडाउन साठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असताना काही व्यावसायिक दुकानदारांकडून लपून-छपून मालाची विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कापड दुकानात तर शटर बंद करून चक्क लग्नाचा बस्ता सुरू असल्याचं महापालिका आणि पोलिसांच्या पथकाने केलेल्या तपासणीत समोर आले. दक्षता पथकाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई  करण्यात आली असून, दोन दिवसात सुमारे सव्वा लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

2. शिक्षकांनी कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे महत्त्वपूर्ण निर्णय
जिल्ह्यामधील दहा हजार प्राथमिक शिक्षक हे कोरोनाशी संबंधित विविध प्रकारच्या ड्युट्या करीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा प्रशासनाकडून पुरविण्यात आलेली नाही. गेल्या दीड महिन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत आज सर्व आरोग्य केंद्रांना आदेशित करण्यात आल आहे. 

3. नगर शहरावरील कचर्‍याचा भार पुन्हा झाला हलका
 कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल्स, बाजारपेठा बंद असल्याने कचऱ्याचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाउन असताना दररोज 150 टन कचरा जमा होत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यात घट होऊन सध्या दररोज 120 ते 125 टन इतका कचरा जमा होत आहे. 

4. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दुसऱ्या दिवशीही गोंधळ
नगरसेवकांचा वाढता हस्तक्षेप आणि अपुरे डोस यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही.. बुधवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला दरम्यान डॉन बॉस्को येथील केंद्रावर वादावादी झाल्याने लस दिली गेली नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेले नागरिक रिकाम्या हाती परत गेले. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर सध्या दुसरा डोस दिला जात आहे. कोवॅक्सिनचा दुसरा डोस मंगळवारी दिला गेला.कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार असल्याचे मेसेज नगरसेवकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले.

5. एमआयडीसीत वर्गणीच्या नावाखाली खंडणीची वसुली  
वर्गणीच्या नावाखाली खंडणीखोरांकडून होणाऱ्या वसुलीला  अनेक उद्योजक व्यवस्थापन आणि छोटे व्यावसायिक वैतागले आहेत.  अनेक वर्षापासून स्थानिक कार्यकर्ते तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांच्या त्रासाला उद्योजक वैतागले आहेत. मात्र त्यावर बोलायला कोणीही नेता पुढे यायला तयार नाही परिणामी व्यावसायिकांचे मनोधैर्य खचून जात आहे अशी  वसुली करणाऱ्या अनेक तथाकथित कार्यकर्त्यांचा नेहमीच उपद्व्याप सुरू असतो.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *