शहराची खबरबात - गर्दी जमलेल्या लग्न सोहळ्यावर पोलिसांची कारवाई
News24सह्याद्री - गर्दी जमलेल्या लग्न सोहळ्यावर पोलिसांची कारवाई... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार नगर शहरात सुरूच .
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार आजही नगर शहरात सुरू असून एलसीबी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याचा पर्दाफाश केला आहे. एलसीबीच्या कारवाईत सात जणांची टोळी समोर आली असून त्यातील तिघांना अटक केली आहे. 27 आणि 32 हजार रुपयांना रेमडेसिवीर इंजेक्शन ही टोळी विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.हेमंत दत्तत्राय कोहक भागवत मधुकर बुधवंत आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
2. मनसेच्या कार्यकर्त्यांचे लस उपलब्ध न झाल्याने रस्त्यावरच ठिय्या आंदोलन
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा थांबता थांबत नाहीये .. शहरात रोजची रुग्ण वाढ आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आरोग्य विभाग कमी पडताना दिसतंय.. अशी परिस्थिती शहरात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध न झाल्याने शहरातील माळीवाडा रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
3. गर्दी जमलेल्या लग्न सोहळ्यावर पोलिसांची कारवाई
गर्दी जमलेल्या लग्न सोहळ्यावर पोलिसांची कारवाई शहरातील भिस्तबाग चौक परिसरातील प्रशांत कॉलनी येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. 50 ते 60 लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
4. शहरातील 'या' रुग्णालयांना मिळाल्या ऑक्सीजन निर्मिती मशीनसह व्हेंटिलेटर
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यामुळे ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरचा सातत्याने तुटवडा भासतो आहे.यातच दानशुर व्यक्तींकडून जिल्हा रुग्णालय व बूथ हॉस्पिटलला 10 ऑक्सीजन तयार करणाऱ्या मशीन व 4 व्हेंटिलेटर मशीन देण्यात आल्या आहेत.
5. राम सत्या लॉन येथे 100 बेडचे आयसोलेशन कोविड केअर सेंटर
खासदार कैलासवासी दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीने वाळूज येथे राम सत्या लॉन येथे 100 बेडचे आयसोलेशन कोविड केअर सेंटरची सुरुवात 24 एप्रिलला करण्यात आली होती. यावेळी 65 पेशंट या कोविड सेंटर मध्ये होते.माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचं या कोविड सेंटर ला मार्गदर्शनने मिळालं आणि येथे उत्तम सुविधा देण्यात आल्यात.
No comments
Post a Comment