राज्यात फक्त 'या' वयोगटातील लोकांच लसीकरण, आजच निर्णय होण्याची शक्यता
मुंबई -
कोरोना लसीची कमतरता असल्यामुळे राज्यात जोपर्यंच मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत 18 ते 45 वयोगटातील सर्वांना सर्रास लस देने शक्य नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 35 ते 44 या वयोगटातील लोकांना आणि विशेषतः इतर आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली जात आहे. 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी केवळ 7 लाख 79 हजारच लसी उपलब्ध झाल्याने लसीकरण संथ गतीनं सुरू असल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे.
45 वर्षावरील लोकांसाठी 9 लाख व्हॅक्सिन मिळाल्या. त्याचं वाटप झालं आणि 8 लाख लसींचा वापरही झाला. आता काही हजारच लसी 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी शिल्लक आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच केंद्राला वारंवार पत्र लिहित आहोत. केंद्रानं दबाबदारी घेतलेल्या 45 वर्षावरील व्यक्तींसाठी तरी लस उपलब्ध करुन द्या, अशी मागणी राजेश टोपे यांनी केलीये. लहान वयोगटातील मुलांच्या अनुषंगाने लागणारे बेड्स, व्हेंटिलेटर तसंच वेगळ्या टाईपचे बेड तयार केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी रात्री दहा वाजता याबाबत चर्चा केली आहे, असे राजेश टोपेंनी सांगितले.
No comments
Post a Comment