Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - बँकेचे फलक दिसण्यासाठी झाडाची कत्तल

No comments

    News24सह्याद्री -





सध्याच्या काळात झाडाचे महत्व आपल्याला पटवून देण्याची गरज आहे का...? तर नाही... तसेच निसर्गाने सुद्दा वेळोवेळी आपले निसर्गचक्र बदलत झाडाचे तितकेच महत्व पटवून दिल आहे भविष्यातआपल्याला निश्चिंत जगायचे असेल तर झाड़ हीच आपली संपत्ति आहे. मात्र आपल्या थोड्या गरजांसाठी झाडे तोडण्याचा प्रकार नगर शहरात घडत असून नगर पुणे रोडवरील एक खाजगी रुग्णालया समोरील एक मोठे जुने झाड़ काही दिवसांपूर्वी तोडण्यात आले होते.  तर आता  गुलमोहर झाडाच्या नवाने जो रोड ओळखला जातो. त्या  गुलमोहर रोड वर पारिजात चौकात एका  खाजगी बँकेने आपल्या  बँकेच्या नावाचा फलक दिसावा म्हणून अनेक वर्षापसून उभे असलेले गुलमोहराचे झाड़ छाटून  टाकले आहे.

 या परिसरातील नागरिकांनी या प्रकारा बद्द्ल तीव्र नाराजी व्यक्त केली  असून ह्या झाडाला हाताने पानी दिल होते.मोठे केले होते.ते झाड़ तोड़ताना पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय 
सरकार एकीकडे झाडे लावा झाडे जगवा  म्हणून नागरिकांना  वारंवार आवाहन करत आहे.. सरकार स्वतः झाडे  लावण्याची मोहिम राबवत आहे. मात्र आपली शोभा वाडवी म्हणून झाडांची कत्तल करने हा  मोठा गुन्हा आहे.. नगर मधे झाड़े तोडणाऱ्यांना  अभय कोण देते हा  मोठा न उलगडणारा प्रश्न आहे.. महापलिका प्रशासन आता  या खजगी बैंकवर झाड़ तोडल्या प्रकरणी काही कारवाई करणार का याकड़े नागरिकांची लक्ष लागून आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *