काळया मनुक्याचे पाणी. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर
मुंबई -
दाक्षे विशेष पद्धतीने सुकवली जातात. त्यातून मनुके तयार होतात. दाक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. मनुका चवीस गोड असून, अनेक पदार्थांची रुची वाढविण्यासाठी मनुकांचा वापर केला जातो. मनुकात फायबर्स, प्रोटीन्स, ऍन्टी-ऑक्सिटंट, व्हिटॅमिन्स, भरपूर असतात. तसेच मनुकामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, थायमिन, व्हिटॅमिन बी-6 देखील आहे.दररोज सकाळी रिकाम्या पोटी काळे मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
1.मनुकामधील फायबर्समुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. कॉन्स्टीपेशन्सचा त्रास असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी उकळलेल्या दूधातून बेदाणे खाणे खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे सकाळी नियमित पोट साफ होण्यास मदत होते.
2.नियमित मनुके खाण्यामुळे पचनक्रीया सुधारते. त्यामुळे ब्लडींगची समस्याही होत नाही.
3.नियमित मनुके खाण्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होणे, छातीत पित्तामुळे जळजळणे, हे त्रास दूर होतात.
4.मनुक्यात लोह, तांबे व जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. यासाठक्ष 10 ते 12 मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालावेत व दुसऱ्या दिवशी भिजलेले मनुके चावून खावेत.
5.मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. त्यामुळे डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी दररोज मनुके खावेत.
7.मनुके खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे ह्यदयविकाराचा धोकाही कमी होतो.
8.काळ्या मनुक्यात लोह आणि व्हिटॅमिन 'सी'चे प्रमाण भरपूर आहे. केसांच्या प्रत्येक समस्येतून सुटका हवी असल्यास नियमित दूधातून काळ्या मनुक्याचे सेवन करावे.
9.त्वचा डॅमेज झाली असेल तर काळा मनुका खाण्याची गरज आहे.
मनुके कसे खावेत:
मुनका तसाही खाऊ शकतो. किंवा 10 ते 12 काळ्या किंवा साध्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुका उपाशीपोटी खाणे जास्त लाभदायी ठरते. काही जणांना काळ्या मनुका खाण्यामुळे त्रास होऊ शकतो. लो ब्लडप्रेशरचा त्रास, ब्लडींग, संबंधित आजार असल्यास किंवा एखाद्या मोठ्या ऑपरेशननंतर सुरुवातीचे काही दिवस मनुका खाऊ नयेत.
No comments
Post a Comment