“मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला”; पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावना
मुंबई -
काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. राजीव सातव यांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली होती, मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील जहांगिर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजीव सातव यांच्या निधानाबद्दल राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील दुःख व्यक्त केले असून, “मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला.” अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या असून, “काँग्रेसचे नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक अभ्यासू व उमदा नेता हरपला त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली !” असे ते म्हणाले.
याचबरोबर पंकजा मुंडेंनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करूनही आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “सामान्य समाजासाठी धडपडणारा, एक तरूण उमदा, युवा नेता राजीव सातवच्या रूपाने आज आपण गमावलेला आहे. ज्यांनी आपलं आयुष्य कष्टामध्ये घालवून अनेक लोकांचे हात एका जीवनाला लागतात जेव्हा तो एका उंचीवर पोहचत असतो आणि तो त्या उंचीवरून अनेक जीवनांना स्पर्ष करत असतो. अशा प्रवासाचं एक उदाहरण असलेल्या राजीव सातवचा घास या क्रूर करोनाने घेतला. मी मनापासून दुःख व्यक्त करते. सातव परिवाराच्या दुःखात समस्त मुंडे परिवार सहभागी आहे. असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.
आज काँग्रेसने तर एक चांगला उमदा युवा नेता गमावलेलाच आहे. पण आज मुंडे साहेबांचा लाडका राजीव हा देखील गमावला आहे. मुंडे साहेबांना वाटायचं युवकांना आपण सहकार्य करायला पाहिजे, पक्षाच्या पलिकडे जाऊन चांगल काम करणाऱ्या, सामान्य समाजासाठी झटणाऱ्याच्या पाठीशी उभं राहीले पाहिजे. राजीव सातव व आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आज त्यांच्या जाण्याने खूप मोठे नुकसान व खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते व मनापासून दुःख व्यक्त करते.” अशा शब्दांमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे.
No comments
Post a Comment