मोठी बातमी - मनपा आयुक्तांचा नवीन आदेश, महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यवहार पुन्हा बंद
News24सह्याद्री -
नगर शहरात किराणा माल आणि भाजीपाला विक्रीला पुन्हा एक जून पर्यंत बंदी घालण्यात अली असून तसा आदेश महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी काढला आहे . दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेने नगर शहरातील किराणा दुकान आणि भाजीपाला विक्री करण्यासाठी सकाळी सात ते अकरापर्यंत मुभा दिली होती मात्र त्या दरम्यान शहरामध्ये पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. महानगर आयुक्तांनी पूर्वीचा आदेश रद्द करून पुन्हा एक जून पर्यंत अनेक गोष्टींवर निरबंध घातले आहेत.पाहुयात नवीन आदेशानुसार त्यामध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार
सुरू असलेल्या बाबीमध्ये वैद्यकीय सेवा औषध दुकाने सुरू राहिल
अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील
घरपोहोच गॅस वितरण सेवा सुरू राहील
सर्व बँका सुरू राहतील दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री फक्त सकाळी सात ते अकरा सुरू राहील
पशुखाद्य विक्री सकाळी सात ते अकरा सुरू राहील
बी-बियाणे खते व कीटकनाशके दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील
बंद असलेल्या बाबीमध्ये किराणा दुकाने तदनुषंगिक मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील
भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी विक्री करणे बंद राहील
अंडी मटण चिकन व मत्स्य विक्री बंद राहतील
शेती निगडीत मशिनरी पंप व इत्यादी दुकाने बंद राहतील
No comments
Post a Comment