Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कर्मचारी पळविण्याची दखल मनपा घेणार का?

No comments

News24सह्याद्री - कर्मचारी पळविण्याची दखल मनपा घेणार का?..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. शहरातील सर्व हॉस्पिटल मधील डॉक्टरांची मिटिंग  

महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या वतीने नगर शहरातील सर्व हॉस्पिटल मधील डॉक्टरांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. या मिटिंगमध्ये रुग्णांना बरे करण्याबरोबरच त्यांची मानसिक स्थिती आणि बिलांच्या बाबत योग्य मार्गदर्शन करून कमीत कमी बिल आकारण्यावर चर्च्या करण्यात आली. 

2. जनतेच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना मिळणार लंगर सेवेच्या ऑक्सीजन कॅन आधार
घर घर लंगर सेवा सर्वसामान्य घटक आणि शासन यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करीत आहे. गरज तिथे लंगर सेवेचे सेवादार पोहोचत आहे. ऑक्सिजनची गरज ओळखून देवधुताप्रमाने लंगर सेवा सर्वसामान्यांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे सरसावली आहे. माहिती नसतानासुद्धा अविरतपणे लंगर सेवेच्या वतीने सर्व स्तरावर सुरू असलेले योगदान प्रेरणादायी आहे. 

3. महापौर बाबासाहेब वाकळे म्हणतात या मुळेच रुग्ण संख्येचा आलेख झाला कमी
कोरोणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन घोषित केलं. त्याला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे रुग्ण संख्येचा आलेख कमी झाला. अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली कोरोना प्रादुर्भाव बाबत महापौर वाकळे यांनी आढावा बैठक घेतली. 

4. चंद्रदर्शन झाले नसल्याने गुरुवारी ईद होणार नाही.
शहरात बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन होऊ न शकल्याने गुरुवारी रमजान ईद साजरी होणार नसून शुक्रवारी होणार असल्याची माहिती हिलाल कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. बुधवारी चंद्रदर्शन होण्याची अपेक्षा होती त्याप्रमाणे हिलाल कमिटीचे सदस्य सर्जेपुरा येथील तांबोळी मशीद मरकस मध्ये चंद्र दर्शनासाठी उपस्थित होते. 

5. कर्मचारी पळविण्याची दखल मनपा घेणार का?
लसीकरण सुरू असताना लसीकरण केंद्रात येऊन दबाव टाकत महिला कर्मचाऱ्यांना खाजगी वाहनातून अनधिकृत लसीकरण केंद्रात घेऊन जानाऱ्यांवर महापालिका काय कारवाई करणार याकडे शहराचं लक्ष लागले आहे? नगर शहरात महापालिकेची सात अधिकृत लसीकरण केंद्र आहेत. या व्यतिरिक्त लसीकरण केंद्रास महापालिकेने मंजुरी दिलेली नाही. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *