Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ

No comments

News24सह्याद्री सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

1. 'राधे' चित्रपटाच्या कमाईतून करणार कोरोनाबाधितांना मोठी मदत
बॉलिवूडचा अभिनेता 'सलमान खान'चा बहुचर्चित 'राधे' हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटातील 2 गाणी रिलीज देखील झाली असून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. दरम्यान, 'राधे' हा चित्रपट प्रदर्शना आधीच सलमान ने एक मोठा निर्णय घेतलाय.

२. सुगंधा मिश्राविरोधात एफआयआर दाखल,
नुकतेच कॉमेडियन सुगंधा मिश्राने कॉमेडियन असलेल्या संकेत भोसलेसोबत लग्न करत आयुष्यानवीन सुरुवात केलीय. 26 एप्रिल रोजी पंजाब येथे हा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी पोहोचलेल्या सर्व पाहुण्यांना 24 तासांसाठी क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. इतकेच काय तर या लग्नात उपस्थित राहणारे पाहुण्यांना लग्नस्थळी जाण्यापूर्वी अँटीजन टेस्ट करावी लागली होती. 

३. सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सध्या चित्रीकरण गोव्यातील मडगांव येथे सुरू आहे. पण कोरोना चा वाढत पांढुरभाव पाहता गोव्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाला अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांचा विरोध आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी नुकताच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या सेटवर येऊन चांगलाच गोंधळ घातलाय.

४. 'द फॅमिली मॅन २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.  'द फॅमिली मॅन'चा पुढील भाग याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे.द फॅमिली मॅन'चा यावर्षी जानेवारीत टीजर लाँच करण्यात आला होता. 

५. जान्हवी कपूरला 'दोस्ताना २'मधून दाखवणार बाहेरचा रस्ता?

 करण जोहरचा आगामी चित्रपट दोस्ताना २ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून करण जोहरने कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर खूप वाद निर्माण झालेले . त्यानंतर करण जोहरला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील करण्यात आले. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर दोस्ताना २ सोबत घराणेशाहीच्या वादाला पूर्णविराम लावण्याचा विचार करतोय.'दोस्ताना २' वरून करण जोहरवर पुन्हा एकदा नेपोटिझमवरून टीका केली जात होती. हा वाद संपवण्यासाठी आता करण जोहर एक मोठे पाऊल उचलण्याची शक्‍यता आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *