पचनशक्ती वाढवण्यासाठी 'या' टिप्स वजनही वेगाने कमी होणार ! वाचा
मुंबई
वजन कमी करण्यासाठी कॅलरीचे सेवन नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. या प्रक्रियेत पचनशक्ती देखील तितकीच महत्वाची आहे. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर पचनशक्ती चांगली असावी लागते. एखाद्या व्यक्तीची पचनशक्ती दिवसभरात किती कॅलरी बर्न करते, यावर सर्व अवलंबून असते. पचनशक्ती ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अन्नातील उर्जा कॅलरीमध्ये रूपांतरित होते आणि शरीराच्या इतर पेशी बनविण्यास मदत होते. जर आपली पचनशक्ती प्रक्रिया मंद असेल तर मधुमेह होण्याची शक्यता आणि रक्तदाब देखील वाढतो. जर आपल्या पचनशक्तीचा दर चांगला असेल तर आपले वजन वेगाने कमी करू शकतो. यासाठी आपल्याला पचनशक्ती वाढविणे आवश्यक आहे. पचनशक्ती कशी वाढवायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्नायू वाढविणे
स्नायू वाढल्याने देखील पचनशक्ती दर वाढतो. तसेच, कॅलरी देखील बर्न होतात. स्नायू वाढविण्यासाठी दररोज व्यायाम करा. यामुळे पचनशक्तीला चालना मिळते.
भरपूर पाणी प्या
पुरेसे पाणी पिण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते जे पचनशक्ती वाढविण्यात मदत करते. थंड पाणी पिण्यामुळे पचनशक्ती दर देखील वाढतो. कमी पाणी प्यायल्यामुळे पचनशक्ती कमी होतो. न्याहारीपूर्वी आणि जेवणाआधी पाणी प्या आणि शरीराला हायड्रेटेड ठेवा.
थोड्या-थोड्या वेळाने खा
थोड्या-थोड्या वेळाने खाल्ल्यास शरीराची चरबी कमी होते. हे आपल्या पचनशक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. हे पचनशक्ती क्रिया वाढविण्यास तसेच कॅलरी बर्न करण्यास मदत करते.
अन्न थोडे मसालेदार बनवा
एका अभ्यासानुसार मसाल्यांमध्ये नैसर्गिक रसायने असतात जी पचनशक्ती वाढविण्याचे काम करतात. तुम्ही खाण्यामध्ये नक्कीच हिरव्या आणि लाल मिरच्या खाव्या. तथापि, जास्त प्रमाणात सेवन हे आरोग्यासाठी निश्चितच हानिकारक ठरू शकते.
ब्लॅक कॉफी प्या
शरीरात पचनशक्ती वाढविण्यासाठी, ब्लॅक कॉफीचे सेवन करा. हे पिल्याने आपला पचनशक्ती दर वाढतो. आपण इच्छित असल्यास आपण ग्रीन टी देखील पिऊ शकता.
पुरेशी झोप घ्या
आपल्या सर्वांना माहित आहे की, चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. ज्या लोकांना पूर्ण झोप येत नाही त्यांचा लठ्ठपणा वाढतो. तसेच पचनशक्ती दर देखील कमी होतो. शरीरात पचनशक्तीय दर वाढविण्यासाठी, दररोज 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्या.
No comments
Post a Comment