Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे

No comments

    News24सह्याद्री औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे..पहा गॉसिप कल्ला मध्ये





TOP HEADLINES

1. अनुपम खेर 'बेस्ट अ‍ॅक्टर'; न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा पुरस्कार

अभिनेते अनुपम खेर  यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. अनेक हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसलेल्या अनुपम यांना आता न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट अ‍ॅक्टर'च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 'हॅपी बर्थडे'या शॉर्टफिल्मसाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

२. भर रस्त्यात हाणलं पाहिजे'; औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवर-  रितेश देशमुख

कोरोनाने देशात थैमान आणि .आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय .कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात सर्रास काळाबाजार सुरु आहे. ही सर्व परिस्थिती पाहून अभिनेता रितेश देशमुख  चिडलाय कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन काही जण रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत.

3. अवधूत गुप्तेने गोव्यात शूटिंग थांबल्याचा केला खुलासा

सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या गोव्यातील शूटिंगदरम्यान गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोंधळ घातला आणि शूटिंगला विरोध केला होता. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे  त्यामुळे आता गोव्यात सुरू असलेले मालिकांचे शूटिंग अडचणीत सापडले आहे.


4. विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी  केली दोन कोटींची मदत!

आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहलीनं व अनुष्का शर्मायांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर या दोघांनी एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. किटो  यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करणार आहेत.

५.'कठीण काळात कमावलेलं पुण्य आयुष्यभर ऊर्जा देईल', अभिनेत्री अश्विनी महांगडे

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील राणू आक्का साहेब यांच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर घरोघरी जाणाऱ्या डब्यांच्या पिशव्यांचा फोटो शेअर करत कोरोनाच्या संकटात घरोघरी जेवण पोहचवणाऱ्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानमधील टीमचे कौतूक केले आहे. तिने म्हटले की, आजाराचा बाजार करून कमवणारे एकीकडे व हे पुण्य कमवणारे एकीकडे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *