Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - मित्राच्या आईला पाठवले पोलिसाने अश्लील मेसेजेस

No comments

 News24सह्याद्री - मित्राच्या आईला पाठवले पोलिसाने अश्लील मेसेजेस..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

१. लॉक डाऊन च्या काळामध्ये गोरगरिबांना रोज दिले जाते मिष्ठान्न भोजन
दिवसेंदिवस  कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्याचा परिणाम गोरगरीब जनतेवर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय.  हाताला काम नाही पोटाला जेवण नाही त्यामुळे अनेक जणांवर उपासमारीची वेळ आलीय. मात्र अशा काळातही अनेक सामाजिक संघटनेकडून सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात दिला जातोय. जो तो आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करीतोय. वाडिया पार्क मित्र मंडळ आणि गाळेधारकांकडून अशाच प्रकारे रोज 200 ते 250 गोरगरीब गरजूंना रोज दुपारचे भोजन दिले जात आहे. 

२. मित्राच्या आईला पाठवले पोलिसाने अश्लील मेसेजेस
तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या एकाने मित्राच्या आईला अश्लील मेसेज टाकून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मदर्स डे च्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्याकडून असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

३. नगर मध्ये देखील "ड्राईव्ह इन व्हॅक्सीनेशन" प्रक्रिया सुरू करावी
सद्ध्या दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना रुग्णांचा आकडा आणि वाढते उन्हाचे तापमान पाहता आपल्या अहमदनगर महानगरपालिकेनी देखील मुंबई प्रमाणे *ड्राईव्ह इन व्हॅक्सीनेशन* हि प्रक्रिया सुरू करावी , कारण अशा  वाढत्या तापमानात, जेष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांगांना रांगेत ताटकळत उभे न राहता सुलभ रीतीने लस घेता येईल आणि वाढत्या उन्हामुळे काही अनुचित प्रकार होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही , त्याच प्रमाणे काही लसीकरण केंद्रांवर खूप सारी अनावश्यक गर्दी होऊन त्या गर्दीमुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती देखील निर्माण झालेली आहे.

४. सहा रेमदेसिविर इंजेक्शन सह काळाबाजार करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडले
अशोक रुग्णांच्या नातेवाइकांना शोधून त्यांना रेमदेसिविर इंजेक्शन जास्त भावाने विकणाऱ्या  टोळीचा नगर चा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय साखळी पद्धतीने होत असलेल्या रेल्वेचे इंजेक्शनचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला या कारवाईस विविध गावातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली त्यांच्याकडून सहा इंजेक्शनही जप्त करण्यात आले.

५. कोरोनाला थोपविण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान कौतुकास्पद
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद टेस्टिंग आणि ट्रेसिंग अतिशय महत्त्वाच्या आहेत टेस्टिंग जितक्या लवकर होईल तितके उपचार लवकर सुरू करता येतील.  नगर शहरात अशाच जलद टेस्टिंगसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्था योगदान देत आहेत. हे कौतुकास्पद आहे नगर शहराला कोरणा मुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *