Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आ. निलेश लंके यांच्या कोवीड सेंटरमधून कोरोना हद्दपार; रुग्णांनी धरला गाण्यावर ठेका

No comments

     News24सह्याद्री -




आ. निलेश लंके यांच्या कोवीड सेंटरमधून कोरोना हद्दपार; रुग्णांनी धरला गाण्यावर ठेका कोव्हीड अर्थात कोरोनाचा संसर्ग कमी व्हायला तयार नाही. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाला आजही हॉस्पिटलमध्ये बेड मिळायला तयार नाही. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कोवीड सेंटरमधील रुग्ण त्यास अपवाद ठरलेत असं म्हणावं लागेल. आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून येथे सुरू करण्यात आलेल्या कोवीड सेंटरला एक महिना पूर्ण झाला. यानिमित्ताने कोवीड सेंटरमध्ये चक्क मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

कुण्या थिएटरमधील हा कार्यक्रम असल्या सारखे वाटले ना कोवीड सेंटरमधील बेडवर काही रुग्ण आराम करत आहेत तर काही रुग्ण आणि उत्साही कार्यकर्ते विनामास्क, सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडवत मनसोक्त नाचण्याचा आनंद घेत आहेत. कोरोना गायब झालाय आणि त्या आनंदात सारेच नृत्यू करताहेत असेच वाटते! पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यापासून सारेच मास्कचा वापर करताहेत! मात्र, या कोविड सेंटरमध्ये मास्कची आवश्यकताच राहिलेली दिसत नाही! मनोरंजनाचे कार्यक्रमांना संपूर्ण राज्यात बंदी घातलेली असताना या कोविड सेंटर मध्ये विशेष बाब म्हणून असे कार्यक्रम होताना दिसताहेत! राज्यात नवा आदर्श यानिमित्ताने निर्माण केला जात आहे का असाच काहीसा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *