जिल्ह्याची खबरबात - खोट्या मॅसेजमुळे नागरिकांना मनस्ताप, ग्रामीण रुग्णालयाकडून दिलगिरी व्यक्त
News24सह्याद्री - खोट्या मॅसेजमुळे नागरिकांना मनस्ताप, ग्रामीण रुग्णालयाकडून दिलगिरी व्यक्त....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
१. ना. थोरात यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु
कोरोना च्या वाढत्या संकटांमध्ये राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मदती करता कृतिशील उपायोजना केल्या आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना तातडीने मदत मिळणे करिता संगमनेर येथील यशोधन कार्यालयात 24 तास कार्यरत अशी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे..
२. दवंडी पिटुन घरोघरी जाऊन मास्क वाटून नागरिकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती
कोपरगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे,प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नगरपरिषदच्या नगराध्यक्ष यांनी प्रभाग निहाय समिती संघटित करण्याकरिता नगरसेवक यांना आवाहन केले होते.
३. खोट्या मॅसेजमुळे नागरिकांना मनस्ताप, ग्रामीण रुग्णालयाकडून दिलगिरी व्यक्त
सध्या लसीकरण बाबतीत नागरिक फार संभ्रमात असून अश्यातच काल अनेकांच्या मोबाईलवर लसीकरण बाबतीत मॅसेज आल्याने नागरिकांनी पहाटे पासून नागरिकांनी गर्दी केली. अज्ञाताने खोडसाळपणे चुकीचा मॅसेज देऊन दिशाभूल केल्याने, याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयच्या वतीने नागरिकांनी चुकीच्या मेसेजला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येते लोकांची दिशाभूल करून प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रकार ज्यांनी केला आहे
४. भूतबाधा उतरविण्याच्या नावाखाली महिलेला दारूपाजुन अत्याचार
कोरोनाच संकट असताना भोंदू बाबा देखील नागरिकांमधील अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. संगमनेरच्या पारेगाव बुद्रुक या गावात एक असाच प्रकार घडला आहे. या ठिकाणी भुतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका मांत्रिकाने महापालिकेवर अत्याचार केल्याचं समोर आला आहे.
५. शेवगाव तालुका हादरला अल्पवयीन मुलाचा निर्घुण खून
शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव सार्थक अंबादास शेळके असून याप्रकरणी अज्ञातविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६. कै. सुमनताई ढाकणे कोवीड सेंटरमध्ये संगीत मैफिल रंगली.
पाथर्डी येथे कै. सुमनताई ढाकणे कोवीड सेंटरमध्ये संगीत मैफिल रंगली. संगीत विशारद जनार्दन बोडखे कलाशिक्षक गणेश सरोदे, राष्ट्रवादीचे देवा पवार फारुख शेख या गायक कलाकारांनी विविध प्रकारचे भक्ती गीत, गवळण, नविन जुने गीत, सादर करून सर्व प्रेक्षक व कोविड रुग्णांचे मन प्रसन्न केले. सर्व संयोजन समिती सदस्य व " कोरोना रुग्ण" यांनी मनमुरादपणे नाचण्याचा आनंद घेतला, रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हि हा कार्यक्रम सुरु होता.
७. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आरोप करणे चुकीचे !
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर राजकीय आकसापोटी व पक्षश्रेष्ठींना खूष करण्यासाठी सूडबुद्धीने काही तथाकथित समाजसेवकांनी आरोप केले आहेत.वास्तविक त्यांचा आजपर्यंतचा सामाजिक वा राजकीय इतिहास पाहता त्यांचे समाजाप्रती किती आणि काय योगदान आहे, हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे.
8. कोरोनासंदर्भातील गंभीर परिस्थीस राज्य सरकारचं जबाबदार आहे. माजी मंत्री रामशिंदे
जामखेड तालुका व सर्वच परिसरातील कोव्हीड रुग्णालयास भेट दिली. तेथील सोयी सुविधा संदर्भात त्यांनी चर्चा केली. तेव्हा बऱ्याच गंभीर गोष्टींचा खुलासा समोर आला असुन ही अतीशय गंभीर बाब आहे. कारण प्रत्येक हॉस्पीटलमध्ये बेड भरपुर शिल्लक आहेत. परंतु ऑक्सीजन पुरवठा होत नाही. तसेच कोरोना रुग्णासाठी रेमडीसीवर इजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. ते इजेक्शन फक्त बारामतीमध्येच कसे मिळतात.
९. अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी बिबट्याची दहशत !
नेवासे तालुक्यातील भालगाव येथील नागरिक महेश भागवत, प्रा. उमेश भागवत हे शेतातून गुप्ताईमार्गे त्यांच्या कारने भालगावकडे येत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या श्रीकांत भागवत यांच्या शेतातून त्यांना ३ बिबटे एका पाठोपाठ कारला आडवे आले. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. तरीही त्यांनी गाडीतून त्या बिबट्याचे व्हिडीओ प्रशासनास व नागरिकांसाठी काढून ठेवले.
No comments
Post a Comment