'या' महिन्यात घेतले जाणार आयपीएलचे उर्वरित सामने, BCCI चे संकेत
मुंबई -
कोरोनामुळे बीसीसीआयने तयार केलेल्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन अचानक स्थगित करावा लागला आहे. आयपीएलमधील स्पर्धेतील 60 पैकी 31 सामने अजून बाकी आहे. हे सर्व सामने कधी आणि कुठे घ्यायचे यावर सध्या विचार चालू आहे. त्याचवेळी ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचे संकेत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व विदेशी टीम सप्टेंबर महिन्यात भारतामध्ये असतील. त्यामुळे आयपीएल सामन्यांसाठी सप्टेंबर महिन्याची विंडो मिळाली तर स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. विदेशी खेळाडू उपलब्ध असतील आणि कोव्हिड 19 ची परिस्थिती नियंत्रणात असेल तर आम्ही टी20 वर्ल्डपच्या पूर्वी या स्पर्धेचा विचार करु. टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी याचा चांगला उपयोग होईल असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
No comments
Post a Comment