9 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. डोसची संख्या वाढवून मिळावी ग्रामस्थांची मागणी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी जमलेली प्रचंड गर्दी पाहुन स्थानिक प्रशासनाने. पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात आले. खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला २०० डोस येतात आणि लस घेण्यासाठी हजारो ग्रामस्थ येतात त्यामुळेआरोग्य केंद्रात तोबा गर्दी होते त्यामुळे सोशल डिस्टसिंग फज्जा उडालेला पाहण्यास मिळत आहे.
2. राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक
राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, अॅपवरील तांत्रिक अडचणी, लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी टाळून मोहिमेत सुसूत्रता आणण्याची गरज आहे.यासाठी सर्वप्रथम राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.
3. जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांचे छापा सत्र सुरूच
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असतानाही काही समाजकंटकांकडून जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच ठेवण्यात आले आहे. या अवैध व्यवसायिंकांवर कारवाईसाठी पोलीस पथके नेहमीच तैनात असतात. मात्र तरीही हे धंदे जोरात सुरूच आहे.
4. दारूच्या नशेत तर्रर्र झाल्या बेवड्या डॉक्टरांकडून महिला डॉक्टरला शिवीगाळ
कोपरगाव शहरातील एसएसजीएम कोविड केअर सेटरमध्ये दारूचे सेवन केलेल्या 2 डॉक्टरांनी कोविड सेंटरच्या ऑक्सिजन विभागाच्या प्रमुख महिला डॉक्टरसह त्यांचे पतीस शिवीगाळ करीत मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉ.भाग्यश्री कुणाल घायतडकर यांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भानुदास पारखे समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय देवीचंद गायकवाड यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे 'माझा जीव माझीच जबाबदारी'..
राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांवर आता 'माझा जीव माझीच जबाबदारी' असे म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका टीका भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.दरम्यान संगमनेर तालुक्यातील निमोण येथील पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन आमदार विखे पाटील यांच्याहस्ते पार पडले.
6. शहरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय स्थगित - नगराध्यक्ष वहाडणे
कोपरगाव शहरात लोकसहभागातून एक ऑक्सिजन प्लान्ट ग्रामीण रुग्णालयात बसविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सभा नुकतीच नगरपरिषदेत पार पडली होती. ऑक्सिजनचा झालेला प्रचंड तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असेच मत सर्वांनी यावेळी मांडले होते. सर्व देशभरातूनच अशा प्लान्टला प्रचंड मागणी आहे असेच सांगण्यात आले. आ. आशुतोष काळे यांनीही एका नविन ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याची ऑर्डर दिल्याचे सांगितले. तो उभारल्यानंतर येणार्या काळात ऑक्सिजनची सोय होणार आहे.
7. 'लसीकरण केंद्रच कोरोनाचे 'हॉटस्पॉट' बनु नयेत'
सध्या १८वर्षा पुढील सर्वांना कोरोना प्रतीबंधात्मक लस दिली जात आहे. मात्र लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो. म्हणून हे लसीकरण केंद्रच कोरोनाचे हॉटस्पॉट बनु नये. यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
नगर तालुक्यातील जेऊर येथे कोरोना व लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली.
8. अगस्ति कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांचा राजीनामा
अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी आपल्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला. श्री घुले यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्या मुळे खळबळ उडाली आहे.अगस्ति सहकारी साखर कारखान्यामधील अंतर्गत कुरघोडी च्या राजकारणाचा ते बळी ठरले असल्याची चर्चा काल दिवसभर होती.
9. शिर्डीत होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांवर प्राधान्याने उपचार : महसूलमंत्री ना.थोरात
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना उपाययोजनांचे कौतुक केल्यानंतर मुंबईच्या धर्तीवर शिर्डीत कोरोना उपाययोजनांचा नियोजन करण्यात येईल केंद्राने अनेक बाबतीत महाराष्ट्रावर अन्याय केला आहे परदेशातून येत असलेल्या मदतीस महाराष्ट्राला वाटा मिळत नसून लसीसीकरणासाठी आवश्यक तितके डोस राज्याला मिळत नसल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय शिर्डी येथे प्रस्तावित जम्बो कोविड सेंटर च्या पाहणी साठी थोरात आले.
No comments
Post a Comment