Breaking News

1/breakingnews/recent

9 मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - मृतदेह बदलल्याने शहा हाॅस्पिटलमध्ये तोडफोड...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. देशाच्या सुरक्षा दलात  मुंबई पोलिसांनमध्ये आत्तापर्यंत ११० कोविडयोद्धे गमावले
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. कोरोना महामारीत गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाइन योद्धे आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. यात डॉक्टरांसोबतच पोलीस दलाचं योगदान देखील फार मोठं आहे.  देशाच्या सुरक्षा दलांमध्ये मुंबई पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 

२. वर्षाच्या मुलासह प्रेयसीची प्रियकराच्या घराबाहेर ४ दिवस ठाण मांडून बसली
महाराजगंज परिसरातील केवटली गावात प्रियकराच्या घराबाहेर २० महिन्याच्या मुलासह प्रेयसी ठाण मांडून बसल्याची अनोखी घटना घडली आहे. अखेर ४ दिवसांनी प्रियकराने प्रेयसीचा स्वीकार केला परंतु कुटुंबाने तिला घरात प्रवेश नाकारला म्हणून सध्या हे दोघंही घरापासून दूर एका झाडाखाली बसून राहिले आहेत.

3. मृतदेह बदलल्याने शहा हाॅस्पिटलमध्ये तोडफोड
वडिलांच्या मृतदेहाऐवजी दुसऱ्याचाच मृतदेह दिल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी  शहा हाॅस्पिटलमध्ये तोडफोड केली. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे रुग्णालय परिसरात प्रचंड ताणतणाव निर्माण झाला होता

4. "राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं"
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला आता महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवसेनेने टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसकडूनही पलटवार करण्यात आला आहे. राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादे पत्र केंद्राला जरुर लिहावे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला .

5. पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्ये नागरिक मोठ्या संख्येने बाहेर
पिंपरीमध्ये  विनाकारण घराबाहेर पडून मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. विनामास्क फिरणाऱ्या अशा ३६१ नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. विकेंड लाॅकडाऊन असतानाही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे यावरून दिसून येते.

6. रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड
फलटण तालुक्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चार जणांचे रॅकेट फलटण शहर पोलिसांनी पकडून गजाआड केले आहे. मुख्य आरोपी सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय असल्याने खळबळ उडाली आहे. सुनील विजय कचरे, अजय सुरेश फडतरे, प्रवीण दिलीप सापते, निखिल अनिल घाडगे असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

7. दिल्लीत लॉकडाऊन वाढविला
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

8. गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ज्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्वरित आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याच तत्परतेने महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याकडे केली आहे.

9. "आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?"
काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना मंत्री अनिल परब यांना धारेवर धरलं आहे. झिशान सिद्धिकी म्हणाले की, वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. मी या मतदारसंघाचा स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहे. तरीही प्रोटोकॉलनुसार मला या कार्यक्रमाला निमंत्रितही केले नाही.

10. भाजपाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला
स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *