Breaking News

1/breakingnews/recent

9 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री राज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत आरोग्यमंत्री टोपेंचं महत्वाचं वक्तव्य...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

१. लांझी येथून पोलिसांनी तलवार केली जप्त
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या गंगापूर तालुक्यातील लांझी येथे तपासासाठी गेलेल्या पोलिसांना एकाकडे तलवार दिसली ती जप्त केली त्यावेळी आरोपी पळून   जाण्यात यशस्वी ठरला. हि घटना शुक्रवार ७ मे रोजी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. विनोद डेव्हीड श्रीसुंदर रा. लांझी ता. गंगापूर असे तलवार बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

२. "देवेंद्र फडणवीसच आभासी"
 देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतेय.  मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवला जात असून, कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 

३. राज्यात पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज
राज्यात आणखी पुढील पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 24 तासांत कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पडणाऱ्या पावसाचं (Rain) कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झालीये, तर उत्तर कर्नाटकचा काही अंतर्गत भाग ते विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.  

४. पिंपरीत अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार
माणुसकीला काळीमा फासणारी आणि तितकीच संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. चोरीच्या संशयावरुन तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एकूण एकोणवीस आरोपींनी हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये माजी नगरसेवक अरुण टाक यांचाही समावेश असल्याचीही माहिती मिळत आहे. 

५. 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु
मुंबईत आज केवळ 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु आहे. मुंबईचं सर्वात मोठ लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी जंबो वैक्सिनेशन सेंटरवर आज नोंदणी केलेल्या केवळ 370 जणांना लस दिली जात आहे. त्यातही कोवैक्सिन साठी लोकांना काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

६. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा
यावर्षी कोरोनाचा राज्यात वाढलेला प्रादुर्भाव पाहता दहावी बोर्ड परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशासाठी नेमके काय निकष असावे ? याबाबत शिक्षण विभागाचे विचार विनिमय सुरू असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षा घेण्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी  शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी का ? विद्यार्थ्यांकडून मत जाणून त्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. 

७. राज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत आरोग्यमंत्री टोपेंचं महत्वाचं वक्तव्य
  राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळं त्या राज्यात कडक लॉकडाऊन लावणार असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी होत नाही. 

८. बेन सर्किटमुळे रुग्णांना मिळतेय संजीवनी
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील संजीवन रुग्णालयातील डॉक्टर उदय पाटील यांनी बेन सर्किट नावाची एक प्रणाली बनवली आहे. या किटमुळे रुग्णाला जवळपास पन्नास टक्के ऑक्सिजन कमी लागतो तसेच या बेन सर्किटमुळे रुग्णांचे ऑक्सीजन सॅच्युरेशन  वाढण्यास देखील मदत होते असा दावा त्यांनी केला आहे. 

९. 'कोविड सेंटरमध्ये घुसून डॉक्टरांसह दोन परिचारिकांना मारहाण
तुम्ही आमच्या वडिलांवर व्यवस्थित औषधोपचार करीत नाही', असे म्हणून कोविड सेंटरमध्ये घुसून कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व दोन परिचारिका महिलांना मारहाण झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर  येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये शनिवारी घडलीय.

१०. एकाच आयुष्यात सोंग करायची तरी किती?
 स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *