7 मे सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - कोरोनानंतर दिल्लीकरांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ची भीती...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. शहरातील कॅनरा बँकेला पहाटेच्या सुमारास आग
भंडारा शहरातील वर्दळीच्या मार्गावरील,मोठा बाजार परिसरात असलेल्या कॅनरा बँकेला आग लागल्याचे,दैनंदिनी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या, काही नागरिकांना गुरवार दिनांक ६ मे रोजी पहाटेच्या सुमारास बँकेतून धूर निघत असल्याचे दिसुन आल्याने, आग लागल्याची घटना उघडकीस आली.
2. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत चोरी करणारे गजाआड
परसोडी नाग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत 7 मार्च च्या मध्यरात्री बॅक घटनेतील आरोपींनी बँक इमारतीच्या मागिल भागातील भिंतीवरील खिडकी तोडून बँकेत प्रवेश करुन, कम्प्यूटर मॉडम चोरुन नेवून पलायन केले होते. या चोरी प्रकरणार्थ बँकेचे व्यवस्थापक यांनी लाखांदूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्याने , लाखांदूर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला होता.
3. भाजपाच्या ४ आमदारांचं कोरोनामुळे निधन
उत्तर प्रदेशमध्ये करोनामुळे आणखी एका भाजपा आमदाराचा मृत्यू झाला आहे. रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजपा आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. दल बहादूर कोरी यांना एका आठवड्यापूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लखनौच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
4. "राजकारणाचे हे रक्ताळलेले रूप आहे"
विधानसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून यावरुन आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. दरम्यान शिवसेनेने यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. प. बंगालची ही परंपरा आहे असे म्हणायचे तर मग रवींद्र संगीत, रवींद्रनाथ टागोर, बंगालची साहित्य-संस्कृती, सामाजिक सुधारणांचा प्रवाह, स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतीची मशाल हे सर्व वाया गेले काय? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
5. कोरोनानंतर दिल्लीकरांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ची भीती!
दिल्लीत करोनाचा कहर असताना आता ‘ब्लॅक फंगस’च सावट घोंघावू लागलं आहे. करोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस एक करोनामुळे होणारं फंगल संक्रमण आहे.
6. पुणे पालिका कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार
मुंबई हायकोर्टाने पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली असून पुणे तसंच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याची सूचना बुधवारी मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी मुंबई हायकोर्टाने पुणे महापालिकेचे आयुक्त मुंबई पालिकेच्या आयुक्तांशी बोलत का नाहीत? असा प्रश्नही विचारला. यावेळी कोर्टाने मुंबई मॉडेल इतर पालिकांनीही स्वीकारले पाहिजेत असा सल्ला दिला.
7. भाजपा खासदाराने मागितली कर्मचाऱ्यांची माफी
बंगळुरुतील दक्षिण बंगळुरू मतदारसंघाचे भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शहरातील दक्षिण विभागात असणाऱ्या बीबीपीएम येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी गेलेल्या सूर्या आणि भाजपाच्या इतर काही नेत्यांनी या केंद्रामध्ये एका विशिष्ट समाजाचे कर्मचारीच कसे नियुक्त करण्यात आले असा प्रश्न येथील व्यवस्थापनाला विचारल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता.
8. काँग्रेस नेते राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र
देशात करोना स्थितीला संपूर्ण केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार करता करता काही सल्लेही देत आहेत. आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोना म्यूटेशन ट्रॅक करण्याचा सल्ला दिला आहे.
9. द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीत भाजपाला धुळ चारत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज (शुक्रवार) द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईच्या राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टालिन यांना शपथ दिली.
10. दिल्ली पोलिसांनी केली ३ जणांना अटक
करोनाच्या संकट काळात मदत करण्याऐवजी वैद्यकीय वस्तूंचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मृत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सध्या संपूर्ण देशभर सुरु आहे. दिल्लीत तर रोज एक प्रकरण समोर येत असल्याने चिंतेत भर पडली आहे. दिल्ली पोलिसांनी अग्निशामक सिलेंडरचं ऑक्सिजन सिलेंडरमध्ये रुपांतर करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
No comments
Post a Comment