7 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
१. पुण्यातील कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील
राज्य सरकारने पुणे शहरासंदर्भात कोरोना रूग्णांची आकडेवारी सादर केली होती.त्यावर आक्षेप नोंदवत न्यायालयाने पुण्यात कडक लॉकडाऊन लावावा अशा सूचना राज्य सरकारला केल्या होत्या. मात्र यावर राज्य सरकारने पुणे शहराची चुकीची आकडेवारी सादर केली असा आरोप करत पुण्याच्या महापौरांनी केला होता. तसेच आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत या असेही ते म्हणाले होते.
२. कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका
कोरोना उद्रेकामुळे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेकविध उच्च न्यायालयांमध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी याचिकेवर सुनावणी झाली.
३. अजय देवगण उभारणार आणखी दोन कोविड रुग्णालये
कोरोना शी दोन हात करण्यासाठी आता अनेक कलाकार पुढे येऊ लागले आहेत. एकिकडे सलमान खान, अक्षयकुमार, सुनील शेट्टी, सोनू सूद अशी मंडळी आपल्या परिने मदत करत असतानाच अजय देवगणही कुठेही गाजावाजा न करता कोविडसाठी मदत करत आहे. अभिनेता अजय देवगण आता मुंबईमध्ये दोन कोविड रुग्णालये उभारणार आहे.
४. सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरण हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं या दोघांना 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
५. ममता बनेर्जीचा केंद्र सरकारवर आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या करोना परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. बंगालमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत असतानाही केंद्र सरकार बंगालचा ऑक्सिजन दुसऱ्या राज्यांकडे पाठवत असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.
६. औरंगाबाद महापालिकेत तृतीयपंथींना नोकरी
औरंगाबाद महानगरपालिका तृतीयपंथी समाजातील व्यक्तींना नोकरी देणार आहे. महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा स्तुत्य निर्णय घेतला. राज्याच्या महापालिकांमध्ये अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होताना दिसत आहे.
७. परीवहनमंत्री अनिल परब कामात अडथळा आणत असल्याचा काँग्रेस आमदाराचा आरोप
शिवसेना नेते आणि परीवहन मंत्री अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जिशान सिद्धकी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील आपला पराभव आता तरी मान्य करायला हवा. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे, असा इशाराही जिशान सिद्धकी यांनी दिला आहे.
८. "देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात"
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,14,91,598 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,14,188 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,915 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,34,083 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
९. सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार
कोरोना संकट काळात लसीसंदर्भात जगभरात संशोधन सुरू आहे. कोरोना लसींच्या वापराबद्दल संशोधनानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांची एक समिती सध्या यावर विचार करत आहे.
10. भारतीय क्रिकेटपटूंना केवळ 'कोविशिल्ड' लस घ्यायचा सल्ला
कोरोनाविरोधी लढ्यात लसीकरण ही ढाल बनलीय. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणावर भर दिला जात आहे. भारत सरकारने तर आता 18 ते 44 वयोगटाच्या दरम्यानच्या लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या योजनेत भारतीय क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे.
No comments
Post a Comment