Breaking News

1/breakingnews/recent

7 मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - आम्हालाही लोकांची काळजी आहे; मोदी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. आणखी किती थुंकणार आमच्यावर?
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, दोन दिवसांअगोदर मराठा आरक्षण रद्द, त्यानंतरगुरुवारी महाराष्ट्र सरकारने १६,००० पदांसाठी मेघा भरती जाहीर केली. अजुन किती थुंकणार आमच्यावर?, असा सवाल उपस्थित करत सरकारने जाहीर विष वाटप करावे, या सरकारने तसा पण मुडदे पाडण्याचा कार्यक्रम हातात घेतलाच आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

2. आम्हालाही लोकांची काळजी आहे; मोदी
सर्वोच्च न्यायालयावर केंद्राने आपली बाजू मांडलिये .न्या. डी.व्हाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपिठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली. केंद्र सरकार केवळ दिल्लीचा  विचार करत नसून संपूर्ण देशाचा विचार करत असल्याचं मेहता यांनी सांगितलं. हा विषय वाद घालण्याचा नसल्याचं सांगूनही दिल्ली सरकारने हा वाद केंद्र विरुद्ध दिल्ली सरकार असा करुन ठेवल्याचा आरोपही मेहता यांनी सरकारची बाजू मांडताना केला. 

3. तरूनाने गळफास घेऊन केली आत्महत्या...
बिहारच्या गया जिल्ह्यातून आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गिनजोय गावातील शिवनाथ कुमार नावाच्या एका तरूनाने कौटुंबिक वादातून आपलं जीवन संपवललय. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहता दु:खी आईनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने गावातील लोकांनी महिलेचा जीव वाचवला.

4. सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही
नुकतेच पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला २१३ जागांवर विजय मिळाला. यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमने-सामने आले आहेत. "माझी शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय टीम पोहोचली आहे. 

5. दिल्लीच्या निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले,  शिवसेनेची टीका
आज जो हिंसाचार उसळला असल्याचे छाती पिटून सांगितले जाते त्याचे मूळ भाजप नेत्यांच्या निवडणुकीतील चिथावणीखोर वक्तव्यात आहे. बंगालातील भाजप नेत्यांनी प्रचारात ताळतंत्र सोडला होता. हिंसेचे खुले समर्थन हे लोक करीत होते. हिंसा करा, खूनखराबा करा, पण निवडणुका जिंका असे त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना जणू आदेशच होते. 

6. अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दातार यांची 'हापूस' भेट
कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित 'अल अदिल' समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली

7. एकही लस वाया जाऊ न देण्याचा केरळचा पराक्रम
केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींपैकी एकही लस वाया जाऊ न देण्याचा, तसेच मिळालेल्या लसींपेक्षा अधिक लोकांना लस देण्याचा विक्रम केरळने केला आहे. या कामगिरीमध्ये त्या राज्यातील नर्सेसचा सिंहाचा वाटा आहे. केंद्र सरकारने एक मे रोजी यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली. केरळने एकही लस वाया न घालविण्याची कामगिरी केली. 

8. चाक निखळूनही विमानाचे मुंबईत थरारक लँडिंग
नागपूरहून मुंबई येथे येणाऱ्या एका नॉन शेड्यूल विमानात गुरुवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. तत्काळ हे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अगदी सुखरुप उतरविण्यात आले.दरम्यान, विमान सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले मंदार भारदे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन करण्यात आले.

9. संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वासासाठी मरतायेत
सीताराम येचुरी यांनी  मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या एका ट्विटमध्ये येचुरी यांनी संसदेची नवीन इमारत बांधण्यासंदर्भातील खर्चाचा देखील उल्लेख केला आहे. "हे बांधकाम थांबवा आणि हा पैसा सर्व भारतीयांना मोफत ऑक्सिजन आणि लसी देण्यासाठी वापरा. 

10. सर्व रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट हवा - उच्च न्यायालय
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट असणे अत्यावश्यक आहे, असे मत उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची गरज भागविण्यासाठी त्यांचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट असणे अत्यावश्यक आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *