7 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - सुपा मंडळ अधिकार्यावर निलंबनाची कारवाई...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. आमदार पवारांच्या पुढाकारातून आरोळे हॉस्पिटलमध्ये एक्स रे सुविधा उपलब्ध
जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांच्या लागणाऱ्या वैद्यकीय साधनांची गरजेनुसार पूर्तताही करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आता या हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे मशिन उपलब्ध करण्यात येत असून त्यासोबतच दोन वैद्यकीय कर्मचारी हे काम पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.
2. जिल्हा बँकच्या गटसचिवांना मिळणार वैद्यकीय विमा सुरक्षा कवच
आशिया खंडात अग्रगण्य असलेली जिल्हा बँक नेहमीच समाजाभिमुख कामात अग्रेसर असते.सध्या राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून या विषाणूमुळे जनसामन्यांचे जनजीवन संपुर्णपणे विस्कळीत झाले आहे.बँकेच्या माध्यमातून काम करणारे गट सचिव जिल्हा बँकेशी निगडीत असलेल्या सोसायटी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सभासद बांधवांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच बँक वसुलीच्या कामासाठी त्यांचा थेट संपर्क जनसामान्यांशी येत असतो.
3. पोलिसांनाच मारहाण आणि दगडफेक
कोरोना काळात लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचं पालन व्हावं याकरता पोलीस अधिकारी आज रस्त्यावर उभे आहेत. दिवस रात्र एक करून त्यांना त्यांची ड्यूटी निभावावी लागत आहे. मात्र देशभरातून अशा घटना समोर येत आहेत की ज्यामुळे डोळ्यात अंजन घालून सामान्य जनतेचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांनाच संरक्षणाची गरज आहे की काय,
४. शिरसगाव येथून न सांगता गेलेली मुलगी सुखरूप
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील 16 वर्षीय मुलगी प्रियंका दत्तात्रय गायकवाड दि.५/५२०२१ रोजी बुधवारी सकाळी 6 वाजता घरी कोणालाही न सांगता घरातील सावत्र आईच्या दररोजच्या वादाला कंटाळून चांडगाव ता.वैजापूर जी.औरंगाबाद येथील काकाच्या घरी निघून गेली होती.
५. सुपा मंडळ अधिकार्यावर निलंबनाची कारवाई
सुपा येथील मंडळ अधिकारी शिवाजी तुकाराम शिंदे यांच्याकडे मेडिकल ऑक्सिजन टॅकर भरून विनाअडथळा नगरला पोहचविण्याची जबाबदारी होती.
6. नेवासा पोलिसांसमोर गावठी कट्टे शोधण्याचे आव्हान
नेवासा तालुक्यात वाळू माफिया, दारू माफिया यांचा सुळसुळाट झाला असून या माफियांकडे असलेले शेकडो गावठी कट्टे शोधण्याचे आव्हान नेवासा पोलिसांसमोर उभे आहे. तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे 2 मे रोजी झालेला गोळीबार आणि त्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा हा पहिल्यांदाच वापरा गेलेला नाही. तर अशा घटना भेंडा परिसर व नेवासा तालुक्यात अनेकदा घडलेल्या आहेत.
७. कोरोनाला साधे जवळ फिरकूही न देता घालून दिला आदर्श वस्तुपाठ
सध्या देशभर कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रोज बाधितांच्या विक्रमी रुग्णसंख्येसह बळींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच दिलासादायक वृत्त पुढे आले असून, साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करुन ऊसतोड मजूर कोरोनाला साधे जवळ फिरकूही न देता मायभूमी परतले आहे.
8. कत्तलीसाठी जनावरे नेताना पकडले
शहरातील संजयनगर येथील हाजी मंगल कार्यालयाजवळ अवैधरित्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेत असताना आरोपी शिवराज भाऊसाहेब आजगे व दुसरा आरोपी अरबाज मजीद कुरेशी या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातील वाहनांतून चार मोठ्या जर्शी गाय व चार लहान गोऱ्हे आदी २ लाख ५० हजारांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला आहे.
९. गंगामाई कारखान्याचा उच्चांकी ऊस गाळप
गंगामाई साखर कारखान्याने १२.५५ लाख मे.टन उसाचे उच्चांकी ऊस गाळप करून शेवगाव बाजार समितीचे माजी सभापती संदीप सातपुते यांचे हस्ते उस वाहतुकीचे वाहनांची व गव्हाणीची पूजा करून गाळप हंगाम २०२०-२१ चा सांगता केली.
No comments
Post a Comment