7 मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - कोरोना काळात गोंदियामध्ये ५ व्हेंटिलेटर मशीन पडून आहेत धुळ खात....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. लसीकरणाच्या निम्मित्ताने सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा..
औरंगाबाद मध्ये ठिकठीकाणी कोरोणा लसिकरण चालु आहे पण या लसिकरणाच्या ठीकाणी सोशल डिस्टन्सिंग चा मात्र फज्जा ऊडताना दिसुन येत आहे नागरिक ऐकमेकांच्या पाठीमागे ऊभे राहुन रांगा लावत आहेत
2. औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांनी बजावले रक्तदानाचे कर्तव्य.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज वाळूज येथील मसिया तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केले. यावेळी आपले रक्तदान इतरांसाठी जीवदान ठरू शकते असे माननीय जिल्हाधिकारी सुनिल चौहान यांनी सांगितले.
3. कोरोना काळात गोंदियामध्ये ५ व्हेंटिलेटर मशीन पडून आहेत धुळ खात
राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातला असून अनेक रुग्णांना रुग्णालयात व्हेंटिलर स्पोर्ट किंवा बेड मिळत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याचे आपण पाहत आहोत .मात्र गोंदिया जिल्याच्या तिरोडा उपजिल्हा रुग्णालयत मागील अनेक महिन्यापासून ५ व्हेंटिलेटर बेड धूळ खात पडून असून . हे बेड शिव सेने समन्वयक पंकज यादव यांनी शोधून काढत जिलाधिकर्यांच्य निदर्शनास आणून देताच .जिल्हाधिकाऱ्यांनी हे व्हॅटिलर मशीन सुरु करण्याचे आदेश दिले.
4. स्फोट होऊन एका कुटुंबातील तीन जण जखमी
गंगापूर शहरातील बसस्थानकासमोर जावेद शहा यांच्या दुकानांमध्ये ४ मे रोजी स्फोट झाला , हि घटना रात्री घडली असून या प्रकरणी पोलिसांची चौकशी चालू असुन परिसर पत्रे लावून सिल करण्यात आला आहे. शहा यांच्या घरामध्ये भाडेकरू असलेले अब्दुल्ला मोहम्मद पठाण पत्नी निलोफर पठाण व मुलगा अबरार पठाण हे घरात झोपले असताना रात्री एक वाजेदरम्यान अचानक स्पोट झाला यामध्ये पठाण कुंटुब जखमी झाले हा स्पोट नक्की फ्रिजमुळे झाला की गॅस मुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
5. जालन्यातील अंबड तालुक्यात दिवसा ढवळ्या रोड रॉबरी
जालन्यात रोड रॉबरीची घटना घडलीय...अंबड तालुक्यातील सोनकपिंळगाव ते सुखापुरी फाट्या दरम्यान ही घटना घडलीय अजय पाटोळे यांनी कालदुपारी 2 ते 2:30 दरम्यान सोनक पिपंळगाव व लासुरा येथून बचत गट कर्जाची वसुली करुन ते अंबडला येत.
6. अन् लातुरात चक्क मृतदेहांची अदलाबदल; एकाच मृतदेहावर दोन वेळा अंत्यसंस्कार!
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे आणि परिणामी अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर लातूरमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. एकाच पार्थिवावर दोन वेळा अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं.धोंडीराम तोंडारे यांचा मृत्यू झाला यावेळी अंबाजोगाईच्या हातोला येथील आबासाहेब सखाराम चव्हाण यांचाही मृत्यू झाला होता.
7. गुडन्यूज ! आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले.
8. यंदा मान्सून वेळेतच ! समाधानकारक पावसाचा अंदाज
कॊरोनाच्या संकटात एक चांगली बातमी आहे. भारतात मान्सूनचे आगमन वेळेवर १ जून रोजी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हा पहिला अंदाज असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी स्पष्ट केले आहे.देशभरात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे.
9. ऑलिम्पिक स्पर्धेतून अमित धनकर बाहेर
भारतीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियन आणि सुमित मलिक यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र, पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागल्याने अमित धनकर ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
10. मराठा आरक्षण; कोर्टाच्या निकालाला आव्हान देणार
मराठा आरक्षण रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर न्यायालयाने अनेक सकारात्मक बाबी विचारात घेतल्याच नसल्याचे दिसून आले. यामुळे रिव्ह्यू पिटिशनद्वारे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात येणार असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी गुरुवारी सांगितले.
No comments
Post a Comment