Breaking News

1/breakingnews/recent

6 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - कोपरगावातून तीन मुलींचे झाले अपहरण...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. संगमनेर तालुक्यात सापडले  चक्क बेकायदा रुग्णालय
वाढते रुग्ण संख्येमुळे संपूर्ण तालुका हादरला असताना तालुक्याच्या पठार भागातून अत्यंत धक्कादायक असे वृत्त हाती आला आहे चक्क साकुर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नाक्यावर तेथील दोन होमिओपॅथी डॉक्टर परस्परच चाचण्या करून त्याच्यावर उपचारही करत असल्याचं समोर आला आहे.

2. मराठा आरक्षण बाबत कायदेशीर मार्ग काढावा कोल्हे
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित बसून त्यावर तोडगा काढावा सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी काल दिलेल्या निकालाचा आदर करत याबाबत पुन्हा कायदेशीर मार्ग काय काढता येईल याचा विचार मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांनी करावा व मराठा समाजाला दिलासा द्यावे असा प्रतिक्रिया माजी आमदार व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केलीये

3. आरोग्य केंद्रासाठी सहा रुग्णवाहिका
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सहा रुग्णवाहिका 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजातून प्राप्त झाल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिले रुग्णवाहिका नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होत होती वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एका गरोदर महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने हेळसांड झाल्याची घटना घडली होती 

4. आरोग्य केंद्रासाठी सहा रुग्णवाहिका
नगरपंचायतने स्वछता कर्मचार्‍यांचे 4 महिन्याचे पगार थकवल्यामुळे शिर्डी महाविकास आघाडीच्यावतीने सत्ताधारी भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना जाब विचारत थकीत कामगारांचे पगार देता येत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आली.

5. शेवगाव तालुक्यातील सात गावे करोना हॉटस्पॉट
शेवगाव तालुक्यातील ठाकुर निमगाव या गावात करोना संसर्ग चिंताजनक पातळीवर पोहचला असून गेल्या काही दिवसात तेथील रुग्णसंख्या 94 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत सात जणांचा करोनाने बळी गेला आहे. 

6. कोपरगावातून तीन मुलींचे झाले अपहरण
कोपरगाव तालुक्यातील बोलकी शहाजापूर व शिरसगाव तेथून मंगळवारी व बुधवारी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना उघडकीस आल्या असून या घटनेची तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पालकांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7. 90 ऑक्सिजन बेडसे प्रवारा कोविड सेंटर सुरू
लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनाचे औचित्य साधून प्रवरा कोविड केअर सेंटर मध्ये 90 ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू करण्यात आलेल्या तसेच ऑक्सिजन बेडची परिपूर्ण सुविधा असलेले प्रवरा कोविड केअर सेंटर एकमेव असल्याने या स्वतंत्र विभागाची मोठा दिलासा रुग्णांना मिळणार आहे

8. पाणी योजनेसाठी एक कोटींचा निधी मंजूर
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे याकरिता मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटींच्या निधीची तरतूद झाली असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे  

9. कोपरगाव शहर पोलिसांनी नऊ गोवंश जनावरांची केली सुटका
कोविडच्या भयावह संकटातही अवैध धंदे सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे काल दुपारी कोपरगाव शहर पोलिसांनी उपनगरांमध्ये कत्तलीचा उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडले या कारवाईत  सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

10. राहाता तालुक्यात नवीन 281 करोनाबाधित
राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 281 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे.गेले चार ते पाच दिवस करोनाने राहाता तालुक्यात दिलासा दिला होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून पुन्हा तालुक्यात करोनाने कहर केला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *