6 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कोरोनाबाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी केंद्रानं चाचण्या कमी केल्या
सध्या देशात मोठ्या प्रमाणात दररोज कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून विरोधक सातत्यानं केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रानं कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी चाचण्या कमी केल्या असल्याचा दावा माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना केली आहे.
2. माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन
राष्ट्रीय लोक दलाचे आरएलडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले. मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते गुरुग्रामच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. फुफ्फुसामध्ये संक्रमण वाढल्यामुळे त्यांची तब्येत नाजूक झाली होती.
3. आसाराम बापूला कारागृहात कोरोना, आयसीयूत दाखल
महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी आसाराम बापूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर जेल प्रशासनाने पुढील उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे.
4. आसाममध्ये कोणाला मुख्यमंत्री करायचे, यावरून भाजप संभ्रमात
आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोणाला करायचे, या मुद्द्यावरून भाजप द्विधा मन:स्थितीत आहे. त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सर्वनंद सोनोवाल यांना बाजूला सारून हिमंत बिस्वा सर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात येईल अशी चर्चा होती; पण सोनोवाल यांना दुखावले तर आसाममध्ये भाजपला ते महागात पडू शकते.
5. देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा
देशात कोरोनाच्या दुसºया लाटेनंतर तिसरी लाट येणे अटळ आहे. मात्र ती केव्हा येणार हे निश्चित सांगता येणार नाही असा दावा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार व ख्यातनाम शास्त्रज्ञ के. विजयराघवन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या लाटा येणार असून त्याचा मुकाबला करण्यासाठी देशाने सज्ज झाले पाहिजे.
6. राज्यातील ६ शिक्षणसंस्था जगातील गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत
सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१-२२ ही क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये राज्यातील सहा शिक्षण संस्थांचा या क्रमवारीत समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आयआयटी मुंबई, आयसीटी, टीआयएफआर या संस्थांचा क्रमवारीत समावेश आहे.
7. गाफीलपणा नको, सावधान, तिसरी लाट येऊ शकते
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण जात असताना आता देशाच्या वैज्ञानिक सल्लागारांनी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली असल्याने कोणीही गाफील राहू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
8. दीड हजाराची मदत मिळायला जून महिना उजाडणार?
कोरोरिक्षाचालकांना नावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, या काळात रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, कल्याण आरटीओ हद्दीतील सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ही मदत मिळण्यास किमान महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
9. महाविकास आघाडीच्या अक्षम्य दुर्लक्षाचा फटका : फडणवीस
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातून रद्द होणे, हे अतिशय दु:खदायी आणि निराशाजनक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे, समन्वयाच्या अभावामुळे आरक्षण रद्द झाले आहे.
10. सिराजच्या भेदक यॉर्कर्सने माजी क्रिकेटपटू झाला प्रभावित
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्मात होते. आरसीबीने हंगामाची सलग चार सामने जिंकत झोकात सुरुवात केली होती. त्यानंतर देखील एक दोन पराभव पत्करावे लागले असले तरी आपला फॉर्म कायम राखला होता. याच कामगिरीबद्दल भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने सिराजचे भरभरून कौतुक केले आहे.
No comments
Post a Comment