Breaking News

1/breakingnews/recent

३ मे Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - लातुरात जम्बो कोविड केंद्र सुरू, १०० बेडची व्यवस्था........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. स्वच्छता आणि पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा अजब दावा
 राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जे. जे. रूग्णालयात कोरोना लसीकरण केले होते. तेव्हा त्यांना पहील्या डोसमध्ये कोविशिल्ड तर दुसऱ्या डोसमध्ये कोवँक्सीन देण्यात आल्यामुळे मोठे रणकंदन माजले होते. 

2. औरंगाबाद मधील कँनाँट गार्डन परीसरात शुकशुकाट
औरंगाबाद मधील वाढती कोरोना संख्या पाहता औरंगाबाद मधील गजबजलेलं मोबाईल मार्केट तसेच विविध कोचींग क्लासेस असल्यामुळे कँनाँट भागात नेहमी विद्यार्थ्यांची तसेच खरेदि दाराची वर्दळ पहायला मिळते पण सध्या लाँकडाऊन मुळे मार्केट पुर्ण पणे बंद असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट  दिसत आहे.

3. लातुरात जम्बो कोविड केंद्र सुरू, 100 बेडची व्यवस्था
लातुर शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णासंख्येत वाढ होत आहे शहरात उपलब्ध असलेले दवाखाने व बेडसची कमतरता जाणवत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जम्बो कोविड सेंटर निर्माण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शहरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर देवस्थानच्या व महानगरपालिका यांच्या वतीने 100 ऑक्सिजनचे तर 10 ICU बेडसची केंद्र उभारले आहे.

4. जीव वाचवण्यासाठी आईला तोंडावाटे श्वास
 देशात कोरोनाने थैमान घातले आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे रोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. दरम्यान, या लाटेमध्ये हादरवून सोडवणाऱ्या घटना समोर येत आहेत. रुग्णांचे होत असलेले हाल, रुग्णांच्या नातेवाईकांच्या पळापळीचे विचलित करणारे काही व्हिडीओ समोर येत आहेत.

5. औरंगाबाद मध्ये रंगले क्रिकेट चे खेळ लाँकडाऊन नियम धाब्यावर
औरंगाबादमध्ये लाँकडाऊन असल्यामुळे विविध परीसरामध्ये लाँकडाऊनचे नियम मोडून बच्चे कंपनी तसेच तरुण सुध्दा क्रिकेट खेळताना दिसुन येत आहेत, यात बहुतांश मुलं मास्क सुध्दा घालत नाही त्यामुळे औरंगाबाद मध्ये काही ठीकिणी कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसून आला आहे...

6. परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या चौकशीतून संजय पांडेंची माघार
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत महाविकास आघाडीला अडचणीत आणलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधातील प्राथमिक चौकशी करण्यास पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नकार दिला आहे. त्याबाबत त्यांनी सरकारला पत्र लिहून असमर्थता कळविली आहे. त्यामुळे सरकारला आता त्यांच्याऐवजी दुसरा चौकशी अधिकारी नेमावा लागणार आहे.

7. वैद्यकीय, नर्सिंग विद्यार्थ्यांना लढ्यात सामील करणार
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ स्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासह संभाव्य उपाययोजनांवर चर्चा करून आढावा घेतला. या निर्णयात नीट परीक्षा पुढे ढकलणे आणि एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोविड-१९ विरोधी लढ्यात सामील करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचीही शक्यता आहे. 

8. देशभरात मोफत लसीकरण करा, सर्वपक्षीय नेत्यांची केंद्राकडे मागणी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात मोफत लसीकरण मोहीम राबवा. या लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोरोना उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आलेल्या 35 हजार कोटींचा वापर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

9. पश्चिम बंगालमधील पराभवामुळे राज्यातील भाजप बॅकफूटवर
पश्चिम बंगालमध्ये विजय मिळाल्यानंतर भाजप महाराष्ट्रात ''ऑपरेशन लोटस'' करून सत्ता आणेल असा तर्क दिला जात होता. मात्र तिकडे कमळ कोमेल्याने महाराष्ट्रातील ऑपरेशनलाही मोठा धक्का बसला आहे. असे असले तरी पंढरपूरच्या विजयाने भाजपला बळ दिले आहे.

10. लोकेश राहुलवर होणार शस्त्रक्रिया, पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का
पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार लोकेश राहुल काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत खेळू शकला नाही. लढतीच्या काही तास आधी तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पंजाब संघाला मोठा धक्का बसला. अचानक अॅपेंडिक्सचा त्रास झाल्याने राहुल तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *