Breaking News

1/breakingnews/recent

18 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री कचरा उचलण्यासाठी बनवलं अनोखं मशीन....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

१. पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण सुरू करा
पुणे शहरात सद्यस्थितीत लसीकरण मोहिम संथ गतीने चालूय. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण  केंद्रांवर नागरिक गर्दी करतायत. त्यासाठी सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण सुरू करावे. अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केलीय पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण २० हजार गृहनिर्माण सोसायटी आहेत. त्यापैकी १२ हजार पुणे शहरात असून  येथील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

२. तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा
 तौक्ते वादळानं सोमवारी मुंबईला हादरवून सोडले. मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं पडली. देशाच्या आर्थिक राजधानीत या वादळानं ९० किमी प्रती तासाच्या वेगानं धडक दिली. या वादळाचा वानखेडे स्टेडियमलाही फटका बसला. 

३. आतापर्यंत समुद्रात अडकलेल्य़ा 177 कर्मचाऱ्यांची सुटका
 तौक्ते चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरातील हिरा आँईल फिल्डमधील 'बार्ज पी-३०५' वरील 148 जणांना वाचविण्यात शोध पथकांना यश मिळालेय. आज सकाळी सहा वाजेपर्यंत भारतीय नौदलाच्या आय एन एस कोची आणि आय एन एस कोलकत्ता या युद्धनौकांनी एकूण १११ तर ग्रेटशिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांनी अनुक्रमे १७ आणि १८ जणांची सुटका केली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हे बचावकार्य सुरू आहे. 

४. बेड मिळवून देण्याच्या नावाखाली उकळले १ लाख ८० हजार
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक झालाय. शहराप्रमाणेच गावातही उपचारसाठी बेड मिळवण्यात अडचणी येतयात. अशा परिस्थितीत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे बेड मिळवून देण्याच्या नावाखाली एका कर्मचाऱ्याने वैयक्तिक १ लाख ८० हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळे येथील दक्ष नागरिकांमुळे हा उघडकीस आला.

५. लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

६. वारकरी संस्था चालकाकडून ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य
आळंदी परिसरातील एका वारकरी संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

७. कचरा उचलण्यासाठी बनवलं अनोखं मशीन
पुण्याच्या अभिषेक शेलार यांनी एक अनोखं मशीन तयार केलं आहे. हे पूर्णपणे ऑटोमॅटिक असं कचरा उचलण्याचं मशीन आहे. त्यांनी या मशीनला जटायू असं नावही दिलं आहे. या मशीनमुळे कचरा उचलणाऱ्या व्यक्तीला आता हाताने कचरा उचलावा लागणार नाही. संपूर्ण काम या मशीनद्वारेच होणार आहे. या मशीनबद्दल अभिषेक सांगतात, भारतामध्ये कचरा उचलणाऱ्या व्यक्तीला हातानेच कचरा उचलावा लागतो. त्यावर आपल्याकडे सध्या कोणता पर्याय उपलब्ध नाही. 

८.“राष्ट्रीय आपत्तीचा सामना करून लोकांचं रक्षण करणं सरकार पाडण्याइतकं सोपं नसतं”
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग प्रंचड वाढल्याने रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचं बघायला मिळालं. त्याचबरोबर वेळेत उपचार न मिळाल्याने वा सुविधांअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. देशात दररोज साडेतीन ते चार हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. लस तुटवड्यामुळे अनेक राज्यांत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्यात आलं आहे. 

९. म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष
करोना झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस या विकारावर उपचार करण्यासाठी राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष आणि उपचाराची यंत्रणा उभी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. 

१०. चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 48 वर, 26 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया
चंद्रपूर  जिल्ह्यात कोरोनासह आता म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब आरोग्य विभागासाठी चिंतेची आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या तब्बल 48 वर पोहचली आहे. यातील 26 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलीय. दररोज चार-पाच रुग्ण आढळत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *