18 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - विनाकारण फिरणार्यांची सक्तीने रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
१. याचिका मागे घेतल्याने कुकडीचे आवर्तनाचा मार्ग मोकळा
कुकडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसल्याचे कारण देत प्रकल्पातून आवर्तन सोडू नये अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणाऱ्या याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतल्याने कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झालाय 20 मे रोजी आवर्तन सोडण्यात येईल अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
२. तौक्ते चक्रीवादळामुळे 299 गावाची वीज खंडित
जोरदार वाऱ्यासह आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणाला जिल्ह्यात मोठा फटका बसला चक्रीवादळाच्या फटक्यामुले अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले वादळामुळे 119 वीज वाहिन्या बंद पडल्या त्यापैकी ४७ आणि 3286 रोहित्रे बंद झाली होती त्यापैकी 1२12 रोहित्रे सुरू करण्यात त्यामुळे 299 गावे प्रभावित झाली होती त्यापैकी अनेक गावांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे
३. बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल पंप कर्मचार्यास रॉडने मारहाण
शहरालगत असलेल्या सावळीविहीर येथील पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी यांनी बाटलीमध्ये पेट्रोल दिले नाही म्हणून त्याचा राग येवून चार जणांनी लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४. विनाकारण फिरणार्यांची सक्तीने रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट
अकोले शहरासह आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा परिणाम आरोग्य विभागासह प्रशासनावर ताण वाढतोय यावर अकोले व राजुर पोलिसांनी अनोखी कारवाई सुरू केली आहे. विनाकारण घरातून बाहेर पडणार्या व्यक्तीची रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे.
५. पाथर्डीत आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर
कोरोना साथ रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले असून अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांना शोधून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू झाली रविवारी रात्री तपास पथकाने धायतडकवाडी येथे छापा घालून आठ पॉझिटिव रुग्णांना ताब्यात घेऊन कोविड केंद्रात भरती केले त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया तहसीलदारांकडून होणार आहे
६. संगमनेर पालिकेकडून लसीकरण केंद्र सुरू
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर आणि तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकारी विविध उपाययोजना करतात शहर कोरोना मुक्त करण्यासाठी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून थोरात क्रीडासंकुलात नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे
७. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार
मराठा आरक्षणासाठी च्या कायदेशीर लढाईत महा विकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल अशी ग्वाही भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सोमवारी एका निवेदनाद्वारे दिली आहे
८. शिर्डीतील ऑक्सीजन प्लॅन्ट आजपासून सुरू
श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी 1200 एल.पी.एम.क्षमता असलेली प्रणाली (पीएसए) बसविण्याचे काम अखेर पूर्ण झाले असून आज मंगळवारी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात येणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.
९. करोनाला गावाबाहेर रोखण्यात चिंचबन ग्रामस्थ यशस्वी
नेवासा तालुक्यातील बहुसंख्य गावांसह नेवासा शहरही कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना नेवासा शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचबन गावात मात्र आजपर्यंत एकही करोना रुग्ण आढळून आला नाही. ग्रामस्थांनी नियमांचे पालन करुन करोनाला गावात प्रवेशच करु दिला नाही. ग्रामस्थांनी करोनाचा शिरकाव होवू न देण्यासाठी घेतलेले निर्णय व नियमपालनामुळे हे शक्य झाले.
१०. जलद गतीने तब्बल 40 ऑक्सिजन बेडचे नवे युनिट उभारले
कोपरगाव येथील रुग्णांसाठी ठरलेल्या संजीवनी कोविड सेंटर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या 40 ऑक्सिजन बेडच युनिट लोकार्पण राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं कोकम खाण्यातील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आला असून अनेक रुग्णांना याचा लाभ होत आहे.
No comments
Post a Comment