18 मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - औरंगाबाद शहर पोलिसांसाठी नवीन बारा चारचाकी वाहने....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. वनविभाग कर्मचार्यांनी दिले खवल्या मांजरला जीवदान
भंडारा वनपरिक्षेत्रातील सोनेगाव येथील सुरेश शहारे या शेतकऱ्याच्या शेतात, दुर्मिळ खवले मांजर, हा वन्यप्राणी आढळून आला. दरम्यान याची माहीती भंडारा वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच,भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.बी.भलावी यांच्या मार्गदर्शनाखाली वन- परिक्षेत्रधिकारी विवेक राजुरकर यांच्या नेतृत्वात भंडारा पथकाचे वाहन चालक अनिल शेळके, वनरक्षक निलेश श्रीरामे, तसेच मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान आदिंनी घटनास्थळी पोहचून, खवले मांजर या वन्यप्राण्यास पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर खवले मांजराची वैद्यकिय तपासणी करुन, पथकाने जवळील वनक्षेत्रात, निसर्गाच्या सानिध्यात सायंकाळच्या सुमारास सोडून दिले व खवले मांजराला जिवदान दिले.
२. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन .
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संभाजीनगर मधील रुग्णालयांत बेड मिळणे अवघड होत आहे. खाजगी रुग्णालयाचा खर्च सामान्य नागरिकांना परवडणारा नाही. त्यामुळे शहरातील पुंडलिक नगर भागातील प्रशस्त वास्तूमध्ये आयसोलेशन कोविड सेंटर सुरू केले आहे.येथे एकूण ५० खाटांचे नियोजन केले असुन २० खाटा ऑक्सिजनच्या व ३० खाटा सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असणार आहेत. रुग्णांचा पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे.
३. चिकलठाणा MIDC शाळेतील गैरप्रकाराबाबत सुभाष देसाई यांना निवेदन.
औरंगाबाद येथिल स्वामी विवेकानंद अँकँडमीने मराठी माध्यमाच्या पुर्ण विद्यार्थ्यांचे T C घरी पाठवल्यामुळे पालक चांगलेच संतापले आहेत पुर्ण औरंगाबाद मधे याच प्रकरणाची चर्चा आहे यासाठीच न्याय मिळावा व संस्थेवर कार्यवाही व्हावी म्हणून पालकांना औरंगाबाद चे पालकमंत्री सुभाष देसाई यांना मागण्यांचे निवेदन सादर केले यावर योग्य कार्यवाही करु असे आश्वासन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
4. वडगाव खदानीत पडलेल्या वृध्द महिलेचा मृत्यु
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या वडगाव कोल्हाटी परिसरातील एका ७० वर्षीय महिलेचा काल खदानीत पडून मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कांताबाई ठाकुर असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे.वडगाव कोल्हाटी येथील खदानीत एका महिले पडलेली असल्याची माहिती सोमवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळ गाठुन नागरिकांच्या मदतीने त्या महिलेस बाहेर काढुन चौकशी केली असता या महिलेचे नाव कांताबाई द्वारकासिंग ठाकुर असल्याचे समजले.
5. डोंबिवलीत पलावा यथे होर्डिंग पडल्याने तीन जण जखमी !
डोंबिवलीत मध्यरात्री पासून सोसाट्याचावारा व पाऊस सुरू आहे.वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक भागात झाडे उन्मुळून पडली आहे.तसेच कल्याण-शीळ रस्त्यावर लावलेला होर्डिंग चार चाकी गाडीवर पडून तीन जण जखमी झाले आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.त्यांना उपचारासाठी जीवदानी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.तर मागच्या वर्षीच्या निसर्ग वादळात पण याच रोडवरील होर्डिंग पडले होते.
६. औरंगाबाद शहर पोलिसांसाठी नवीन बारा चारचाकी वाहने.
औरंगाबाद मधील डायल -112 प्रकल्पकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहर पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन बारा चारचाकी वाहनांचे पालकमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.भविष्यात नागरिकांना तात्काळ मदती करता टोल फ्री क्रमांक डायल- 112 ची उभारणी करण्यात येणार आहे.त्यामुळे गस्तीवरील वाहनांना नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचत त्यांना मदत करता येईल.
7. लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडेसिविरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिल्या.
8. ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका
तौक्ते चक्रवादळाच्या तडाख्यामुळे ठाण्यात चालत्या मोटार कारवर झाड कोसळल्याची घटना काल सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तातडीने धाव घेत ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकांनी या कारमधील वेक्तीची सुखरुप सुटका केली.नौपाडा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाजवळील रस्त्यावरुन गोडबोले रुग्णालयाकडे जात असलेल्या चालत्या मोटारकारवर हे झाड अचानक कोसळले.
9. लसीकरण पूर्ण होऊनही पुण्याचे विभागीय आयुक्त दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी दिवसरात्र काम करणारे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. राव यानी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्रास सुरू झाल्याने कोरोना चाचणी केली.
10. बल्लारपूर पोलिसांनी पकडला साडेदहा किलो गांजा जप्त
चंद्रपूर येथील बल्लारपूर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून दोन ठिकाणी धाड टाकून दोन इसमाकडून १० किलो ४९० ग्राम गांजा जप्त केला. या कारवाईत १ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment