Breaking News

1/breakingnews/recent

17 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


१. सिडको प्रशासनातर्फे पुन्हा मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी
औरंगाबाद वाळूज तिसगाव परिसरात असलेल्या राजस्वप्नपुर्ती आणि आदर्श कॉलनीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गेल्या वर्षी  पावसाळ्यात देवगिरी नदीला पूर आल्याने  वाहुन गेली होती .आता राजस्वप्नपुर्ती व आदर्श कॉलनीत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सिडको प्रशासनाने सुरु केले आहे. या कामामुळे या दोन्ही वसाहतीतील नागरिकांची पाणी टंचाईतुन सुटका होणार आहे.  

२. खाबांवरुन जमिनीवर करंट उतरून डुकराचा मृत्यू, नागरिकांनाही धोका..
औरंगाबाद येथिल मुकुंद नगर येथे पाऊस पडल्यामुळे  लाईटच्या खांबातून जमिनीवर करंट उतरले यामुळे ऐका डुकराचा खाबांला चिकटल्यामुळे करंट लागुन मृत्यु झाला अजून पावसाळा व्यवस्थित चालुही झाला नाही ऐक तासभर पावसाने खंब्यात करंट ऊतरलं तर पावसाळ्यात काय होईल हे ऊदगार भितीपोटी नागरिकांच्या तोंडून निघत आहे.

३. गंगापुर तालुक्यात आठवडी बाजारात शासनाचे नियम धाब्यावर
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यात लाँकडाऊन असतानाही आठवडी बाजार भरवण्यात आला या आठवडी बाजारात वाढत्या कोरोणा परिस्थिती मुळे करण्यात आलेल्या सुचना नागरिकांकडून पायदळी तुडवण्यात आल्या... बहुतेक नागरिकांनी मास्क सुध्दा परिधान केलेले नव्हते व सोशल डिस्टसिंगचा पुर्णपणे फज्जा ऊडाला असल्याचे दिसून आलेय.

४. चक्रीवादळामुळे रेल्वे गाडय़ा रद्द  
नागपूर येथे अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के  चक्रीवादळामुळे रेल्वेने नागपूरमार्गे पुरी आणि हापाकडे जाणारी रेल्वे ...१७ आणि १९ मे रोजी बिलासपूर आणि ओखा येथून निघणाऱ्या गाडय़ा रद्द के ल्या आहेत. या गाडय़ा नागपूरला १७ आणि २० मे रोजी येणार नाहीत. 

५. उजनीचा पाणी प्रश्न पेटला
उजनी धरणातील 5 टी एम सी पाणी सांडपाण्याच्या नावावर इंदापूर तालुक्यात वळवण्यास मान्यता मिळालेली आहे. उजनी धरणातील शंभर टक्के पाणी वाटप झाले आहे. तरीही पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली वळवल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

६. प्रशासनाला बचावासाठी सतर्कतेचा इशारा
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा,... बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली.

७. रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका
 करोना संकटात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली होती. रासायनिक खतांच्या किंमतीत केंद्र सरकारने ७०० ते ८०० रुपयांची वाढ केली आहे.  

८. शहरात आता सुपर स्प्रेडरची चाचणी
नागपूरमध्ये करोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने दहाही झोनमध्ये बाजारपेठा, बँक,  शासकीय आणि खाजगी कार्यालय, दुकाने इत्यादी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर’ची करोना चाचणी करण्यात आली. शनिवारी दहा झोनमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहा हजारापेक्षा जास्त नागरिकांची चाचणी केली. 

९. लस खरेदीसाठी ठाणे पालिकेची जागतिक निविदा
ठाणे येथे करोनाकाळात उत्पन्न घटल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार देतानाही नाकीनऊ येणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या आदेशामुळे करोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी निधीची तजवीज करावी लागणार आहे. 

१०. कोल्हापूर येथे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक संचारबंदी लागू झाली असून याला  नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते.तसेच  विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवरदेखील  कारवाई केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *