17 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - धक्कादायक ! राज्यातील हवामान बदलाचा अंदाज देणारे 3 रडार नादुरुस्त...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. "घरात नाही दाणा, पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा"; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका
गेल्या काही दिवासांपासून मुंबई, ठाणे, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे.
2. खवळलेव्या समुद्रात अडकले 273 कर्मचारी, वादळाला भेदत नौदलाची INS Kochi निघाली बॉम्बे हायकडे
तौक्ते वादळ मुंबई जवळून गुजरातकडे वेगाने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाच्या संकटातून मुंबई थोडक्यात बचावली आहे. पण मुंबईसह उपनगरात पावसाने धुमशान घातले अरबी समुद्रात असलेल्या बॉम्बे हायमध्ये बार्ज कंपनीचे 273 कर्मचारी अडकल्याची माहिती समोर आली असून मुंबईच्या समुद्रात इंधन आणि नैसर्गिक वायू गोळा करण्याचं काम करणाऱ्या बॉम्बे हायमध्ये कर्मचारी अडकल्याची वृत्त हाती लागले बार्ज कंपनीचे एकूण 273 कर्मचारी अडकले आहे.
3. धक्कादायक ! राज्यातील हवामान बदलाचा अंदाज देणारे 3 रडार नादुरुस्त ?
देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे गुजरात महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये तौक्ते चक्रीवादळाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. केवळ समुद्र किनारीच नव्हे तर राज्यातील इतरही भागांमध्ये या वादळाचा परिणाम म्हणून मुसळधार पाऊस होत असल्याचे पहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना तसेच घरं पडल्याच्या घटना समोर येत असताना.
4. "अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?"
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसंच उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.
4. गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही -खासदार प्रज्ञा ठाकूर
नेहमीच आपल्या विधानांवरून चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कोविडमुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे.
5. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक
सीबीआयने छापे टाकत तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि एका आमदाराला आज अटक केली. नरडा भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक कऱण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहेत.
6. सुविधा अपग्रेड करण्यासाठी निर्णय
देशात सध्या मोठ्या प्रमाण डिजिटल बँकिंग पर्याय उपलब्ध आहे. सहज सोप्या पद्धतीने डिजिटल माध्यमांतून देवाणघेवाण केली जाते. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील आहे. या दरम्यानं डिजिटल व्यवहारासंदर्भात आरबीआयने एक सूचना जारी केलीय. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काही अपडेट केले जाणार आहेत.
8. कोव्हिन पोर्टलवर करण्यात आला बदल
कोव्हिन पोर्टलवर कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या लसीसाठी आता १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. कोव्हिन डिजिटल पोर्टलवर दोन डोसच्या दरम्यानचा कालावधीमध्ये पुन्हा बदल केला आहे.
आता कोव्हिडशील्डची दुसरी लस ही १२ ते १६ आठवड्यानंतर मिळणार आहे.
9. ‘तौते’चे तुफान! नांगरलेल्या बोटीचे दोर तुटून बोटी आदळल्या किनाऱ्यावर
अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठंमोठ्या लाटा व वादळामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
10. देवगडमध्ये समुद्रात रंगला थरार
तौते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसलेला असून मच्छिमार तसंच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे समुर्दाला उधाण आलं असून अनेक ठिकाणी किनाऱ्यावर उभ्या नौकांना फटका बसलाय. देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत.
No comments
Post a Comment