17 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - पत्नीला ठार करून पतीचा आत्महत्येचा बनाव...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
१. कोरोना योध्दा डॉ. भरत दारकुंडे यांचा सत्कार
जामखेड येथे कोरोना काळात खरे कोरोना योध्दा म्हणून काम करत असलेले डॉ. भरत दारकुंडे यांचा सत्कार शिर्डी संस्थांन मार्फत करण्यात आला आहे. यांच्या विषयी अरणगावचे सरपंच लहु शिंदे यांनी प्रसार माध्येमाशी माहिती दिली आहे . जामखेड मध्ये कोरोना आजाराची दुसऱ्या लाटेत रुग्ण संखेत वाढ झालेली असताना रुग्णांनवर योग्य पध्दतीने उपचार करत आहेत.त्यामुळे त्यांना जामखेड मध्ये माणसारुपी देवदूत म्हणून ओळखु लागले आहेत.
२. शासनाने दुधाला ३० रुपये दर द्यावा.
शेतीला पुरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसायात सद्या अडचणीत सापडला आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने दूध उत्पादक शेतकरी देखील अडचणी आले आहेत. लॉकडाऊनच्या आधी असलेला ३० ते ३१ रुपये दुधाचा दर सद्या २४ ते २५ रुपयावर आला आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपल्याकडील पशुधन मातीमोल भावात विकण्याची वेळ आलेली आहे.
३. रिक्षा चालक सरकारी मदतीपासून वंचित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध घटकांसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये परवानाधारक रिक्षाचालकांसाठी प्रत्येकी एक हजार 500 रुपये इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी ऑनलाइन पोर्टल तयार करून त्यावर रिक्षाचालकांना अर्ज करायचे आहे. मात्र लॉकडाऊनला एक महिना झाला तरी पोर्टल तयार न झाल्याने नगर जिल्ह्यातील तीन हजार 520 रिक्षाचालक सरकारी मदतीपासून वंचित आहे.
४. पत्नीला ठार करून पतीचा आत्महत्येचा बनाव
कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यावर टणक शस्त्राने वार करून ठार केले. त्यानंतर मृत शरीरावर काहीतरी ज्वालाग्राही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर नवीन कपडे घातले आणि पत्नीने आत्महत्या केल्याचे खोटी माहिती नातेवाईकांना देऊन, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील सुवर्ण विजय गवळी हिने आत्महत्या केली.
५. ऊस उत्पादन वाढविण्यावर अधिक भर द्या.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने बाहेरून ऊस आणून अनेक संकटावर मात करीत चालू वर्षाचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. मात्र प्रत्येक वर्षी आपल्याला बाहेरून येणाऱ्या उसावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक ऊस उत्पादकांनी आपला स्वतःचा ऊस उत्पादित करून दर हेक्टरी उसाचे उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा.
६. मतदार यादीतून लसीकरण करावे
राहुरी तालुक्यातील कोविड लसीकरणाबाबत ज्या गावांमध्ये जास्त लोकसंख्या असेल त्या गावाला प्राधान्य देऊन गावो-गावाच्या मतदार यादीनुसार लसीकरण करा.. अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. मांजरी आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या 20 गावांच्या दक्षता समितीच्या प्रतिनिधींसमवेत मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली.
७. रविवारी जिल्ह्यात 3296 रुग्णांनी कोरोणावर केली यशस्वी मात
जिल्ह्यात रविवारी 3296 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या दोन लाख सात हजार 138 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता एकूण 90 पूर्णांक 42 टक्के झाले असून रविवारी जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत दोन हजार 882 ने वाढ झाली होती.
८. तहसीलदारांना वेळेच भान आहे की नाही
वांबोरी वशिलेबाजी करून लसीकरण केले जात आहे. असा आरोप होत असताना, ऊर्जा आणि नगर विकास राज्यमंत्री यांनी रविवारी बोलावलेल्या आढावा बैठकीत तहसीलदार उशिरा पोहोचले, तत्पूर्वी बैठक सुरू असतानाच मंत्री तनपुरे यांनी तहसीलदारांना वेळेच भान आहे. का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय.
९. मांडवगण येथे गांजाची 110 झाडे जप्त
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण परिसरात श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून पाच लाख 40 हजार रुपये किमतीच्या 54 किलो गांजा ची 110 झाडे जप्त केली आहे. कॉन्स्टेबल किरण बोराडे यांच्या फिर्यादीवरून रामदास गेणु रायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१०. मुलींनो महिलांनो आमिषाला बळी पडून कुणासोबत ही फोटो व्हिडिओ काढू नका.
मुली आणि महिलांना प्रलोभने दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं अगोदर सर्व साधारण फोटो काढायचे नंतर प्रेमाची स्वप्न दाखवून त्यांच्याशी लगट करुन वेगवेगळे अश्लील फोटो व्हिडिओ काढायचे. मात्र त्यांचा दूषित हेतू लक्षात येतात नकार दिला जातो. मग मुलांकडून अश्लिल फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जातात.
No comments
Post a Comment