Breaking News

1/breakingnews/recent

17 मे Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - दरोडेखोराचा धुमाकुळ, ३५ हजाराचा ऐवज लंपास....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानेच राज्याला सर्वाधिक मदत -देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राला आवश्यक असलेली मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नेहमीच मागत असतो. त्यामुळे पंतप्रधानांनी राज्याला सर्वाधिक रेमडेसिविर, प्राणवायू, व्हेंटिलेटरचा पुरवठा केला. त्याचा योग्य वापर करून घेण्यात राज्य शासन अपयशी ठरले, असा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

2. रुग्णसंख्येत घट, करोनाबळींमध्ये वाढ
राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख घसरू लागला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ३४,३८९ नवे रुग्ण आढळले. मात्र, करोनाबळींची संख्या वाढली आहे. याच कालावधीत ९७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक मृत्युसंख्या आहे.

3. 1 जूनपर्यंत संचारबंदी राहणार
 महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता.

4. मुंबई , ठाणे, पालघर रायगड या भागात  चक्रीवादळाची  शक्यता
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने रविवारी अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. रविवारी या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा दिला.आहे तर  आज  मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

5. कल्याण-डोंबिवलीत विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट सुरू
ब्रेक द चैन या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन ची कडक अंमल बजावणी केली जात आहे. काल केडीएमसी आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली आणि विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर सक्त कारवाईचे आदेश दिले.त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

६. रोडेखोराचा धुमाकुळ ३५ हजाराचा ऐवज लंपास
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या परिसरात अज्ञात तीन ते चार दरोडेखोरोना घाणेगाव -विटावा शिवारात  धुमाकुळ घालत तीन घरे लुटली. या दरोडेखोरांनी दोघांना मारहाण करीत कोयता व चाकुचा धाक दाखवुन तीन घरातील सोन्या-ाचंदीच्या दागिन्यासह ३५ हजाराचा ऐवज लांबविला आहे या प्रकरणी वालुज एम् आय डीसी पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अलाय.

७. डोंबिवलीत आपापसातील भांडणातून एकावर चाकूने वार
डोंबिवली येथील आयरेगाव परिसरात राजू सोनार हा रस्त्यावर उभा असताना रोहित धोत्रे, ओमकार आणि नवले यांनी रस्त्यावर उभा असलेल्या राजू सोनार याला इकडे का उभा आहेस असे विचारून शिवीगाळ केली.या भांडणाच रूपांतर मारहाणीत होऊन जखमी केले तसेच घरात घुसून तोडफोड करण्यात आली. या संदर्भात रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार राजुच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली.

८. भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांची कंटेनमेंट झोनला भेट*
कोरोनाचे रुग्ण असलेल्या ठिकाणी, भंडारा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. जिल्ह्यात सद्या अनेक ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन आहेत. याठिकाणी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियां- कडून, कोविड प्रोटोकॉल नियमांचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित असल्याने.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *