16 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - नाना पटोलेंची टीका झोंबली? देवेन्द्र फडणवीसांचं प्रतिउत्तर...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला
राज्यातील आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला आहे. या आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. हे आरक्षण मातीमोल केलं आहे, असा घणाघाती हल्ला करतानाच आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडलं, याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
2. नाना पटोलेंची टीका झोंबली? देवेन्द्र फडणवीसांचं प्रतिउत्तर
देशाला स्मशानभूमी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे, असं आव्हान काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. पटोले यांची ही टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना चांगलीच झोंबलेली दिसतेय. फडणवीसांनी या टीकेची दखल घेत पहिल्यांदाच पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे. मी मोदींना नेहमीच पत्रं लिहित असतो, पण कांगावाखोरांना उत्तर देत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
3. ‘मुंबई मॉडेल’ पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवताहेत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्रं लिहून कोरोनाच्या मुंबई मॉडेलची पोलखोल केली आहे. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे. मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
4. मी संसदेतील चांगला मित्र गमावला: पंतप्रधान मोदी
राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

5. “माझा डॉक्टरांनी” गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं – मुख्यमंत्री
राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डॉक्टरांना गृह विलगीकरणात रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं असं आवाहन केलंय.
6. 'स्पुटनिक व्ही'ची दुसरी खेप भारतात दाखल
भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश होणार आहे. नागरिक लवकरच रशियाच्या स्पुटनिक-व्ही लस दिली जाणार आहे. आज स्पुटनिक-व्ही लसची दुसरी खेप हैदराबादला आली आहे. यापूर्वी, 1 मे रोजी लसींची पहिली खेप भारतात पोहोचली होती.
7. इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील 'AP' सह इतर मीडिया ऑफिसेस उद्ध्वस्त
सध्या गाझा पट्टी, पूर्व जेरुसलेम आणि इस्रायल हा सततच्या होणाऱ्या स्फोटांनी हादरतोय. इस्रायलचं सैन्य आणि गाझा पट्टीवर नियंत्रण असलेला पॅलेस्टिनी कट्टरपंथीय गट हमास पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. यातच आज इस्त्रायलने केलेल्या.
8. राजधानी दिल्लीत लॉकडाऊन वाढवला; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
कोरोना च्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. राजधानीत आता 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या दरम्यान, निर्बंध शिथील करण्यात आलेले नसून निर्बंध कायम असणार आहेत.
9. पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचा राज्यभर आंदोलनाचा इशारा
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाल्याने या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खत दरवाढी विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
No comments
Post a Comment