Breaking News

1/breakingnews/recent

16 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे काेराेना बाधित...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


1. म्युकोरमायकॉसिसचा जिल्ह्यात पहिला बळी

म्युकोरमायकॉसिस आजाराच्या जिल्ह्यातील पहिल्या बळीची नोंद कर्जत तालुक्यात झाली आहे. मिरजगाव येथील 35 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे.

2. गाव बंदचा चोरट्यांनी उठविला फायदा
करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुक्यातील कारेगाव येथे 12 ते 18 मे कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय ग्रामस्थांनी घेत अंमलबजावणीही केली. मात्र याचा फायदा चोरट्यांनी घेतला. शुक्रवारी रात्री एक किराणा दुकान व एक घरफोडी करून ऐवज व रोख रक्कम लंपास केली. गावातील अनेक सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून लवकरातलवकर चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

3. कोपरगावात ऑक्सिजन प्लँटचे काम सुरु : आ. काळे
करोनाच्या दुसर्‍या लाटेत हजारो नागरिकांना कोरोनाची बाधा होवून अनेक बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत होती. मात्र देशासह राज्यात ऑक्सिजनची निर्मिती मर्यादित असल्यामुळे अनेक बाधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. 

4. दारू पिण्यासाठी घेतलेले पैसे परत न केल्याने एकाचा खून
पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही, म्हणुन झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  
5. तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली कार
 कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे पोलीस वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी नाशिकहून पुण्याकडे कार घेऊन चाललेल्या चालकाने पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घातली. यात सुदैवाने ते बचावले. मात्र, पायावरून कारचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

6. राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे काेराेना बाधित
  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे हे कोरोना बाधीत झाले आहेत. .  आमदार डॉ. लहामटे यांच्या कार्यकर्त्यांकडून ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. आमदार डॉ. लहामटे हे कोविड पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. मात्र तालुक्यातील शासकीय गोदामातून सुमारे ५६ लाख रुपयांचे ८०० पोते गहू, तांदूळ आदिवासी जनतेच्या तोंडातून काढून कोणाच्या घशात चालले होते. 

7. कोरोना लस घेण्यासाठी   नागरीकांची गर्दी    
नागरिकांना कोरोना पासून स्वतःचा बचाव करायचा आहे लसघेण्यासाठी  आता  नागरिकांची  धडपड सुरूआहे पण शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा खेळखंडोबा झाला श्रीरामपुरात आज मेन रोड येथे  लस  स घेण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावून गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.
    
8. जनावरांचे बाजार बंद असल्याने लाखोंची उलाढाल ठप्प
जनावरांचे बाजार सध्या बंद आहे त्यामुळे या बाजारामधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार कसे व कोठे करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे लोणी घोडेगाव नेवासा कोपरगाव आळेफाटा येथील जनावरांची आठवडे बाजार  गाईंच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत 

9. दुसर्‍या ऑक्सीजन प्लॅन्टचेही काम सुरू होईल
 जिल्हा नियोजन अंतर्गत अकोले ग्रामीण रुग्णालयात 15 जून पर्यत 100 बेड क्षमतेचा ऑक्सीजन प्लॅन्ट सुरु होईल व लवकरच आदिवासी उपयोजनेतुन तालुक्यात दुसर्‍या ऑक्सीजन प्लॅन्टचेही काम सुरू होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

10. राहुरीत लसीकरणाचं योग्य नियोजन
राज्यामध्ये अनेक भागांमध्ये लसीकरणा दरम्यान गोंधळ पाहायला मिळतोय  पण अहमदनगर जिल्ह्या मधल्या राहुरी मध्ये  सध्या लसीकरणाचा अनोखा प्रयोग राबवण्यात येतोय या वेळी ज्या नागरिकांनी पहिला डॉस घेतलेला आहे त्यांनाच फोन करून  दुसरा लसीचा डोस  घेण्यासाठी बोलावलं जातंय राज्यमंत्री प्प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा पॅटर्न राबविला जातोय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *