16 मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - रिलायन्स समूहाकडून रुग्णवाहिकेसाठी मोफत पेट्रोल व डिझेल!....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. जायंटस ग्रुप आँफ वाळूजच्या वतीने घाटी रुग्णालयाला औषधी भेट
कोरोनाचा सामना करत असताना उपचारादरम्यान कुठल्याही औषधांचा तुटवडा पडू नये म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्योजकांकडे सीएस आर फंड मधून आवश्यक असलेले औषध घाटी रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव मांडला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत जायंटस ग्रुप ऑफ वाळूज यांनी कोरोना उपचारादरम्यान लागणाऱ्या औषधी मा. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळलीकर यांना देण्यात आले.
२. युवा सेनेच्या वतिने स्वामी विवेकानंद अँकँडमीला ठोकले ताळे
औरंगाबाद येथिल चिकलठाणा MIDC मधील स्वामी विवेकानंद अँकँडमी या शाळेने मनमाणी कारभार करत शाळेत असलेल्या मराठी मिडीयमच्या मुलांना कोरोणाच्या नावाखाली वेठीस धरले आहे. या शाळेच्या प्रशासनाने शाळेत असलेल्या मुलांच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता सर्व मराठी मीडीयमच्या मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले कुठलीही पुर्व कल्पना न देता विद्यार्थ्यांच्या घरी स्पीड पोस्टामार्फत पाठवलेटी.
३. सिमेन्स कंपनीत क्रेनच्या चाकाखाली सापडून कामगार ठार
औरंगाबाद वाळूज एमआयडीसीतील सिमेन्स कंपनीत गुरुवारी १३ में ला क्रेनच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान त्याच दिवशी दुपारी ४.३०च्या दरम्यान शहरातील खाजगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे. परमेश्वर शिरसे असे मयत कामगाराचे नाव असून या प्रकरणी क्रेनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परमेश्वर शिरसे हे बजाजनगरातील वैद्यान क्रेन सर्व्हीसेस यांच्या क्रेनवर सिमेन्स कंपनीत हेल्पर म्हणून काम करीत होते.
४. रिलायन्स समूहाकडून रुग्णवाहिकेसाठी मोफत पेट्रोल व डिझेल
कोरोनाकाळात गेल्या वर्ष भरापासून उद्योग समूह रिलायन्सचे मुकेश आंबानी आणि नीता अंबानी यांच्या मार्फत कोरोना रुग्नाना घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांना आणि आता दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना सुद्धा रिलायन्स च्या पेट्रोल पंपावर ५० लिटर पेट्रोल, किंवा ५० लिटर डिझेल मोफत देण्याची योजना सुरू केली आहे.
५. डोंबिवलीत मनविसेची विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची मागणी
जास्तीत जास्त तरुणांना लवकरात लवकर लस द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. याकरिता हॅशटॅगचा वापर करत पंतप्रधान यांना ट्विट केले आहे. वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू करण्यात आलेले लसीकरण लसीच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी बंद झाले आहे. सर्वच वयोगटातील लोकांना खास करून युवकांना लसीकरण सुरू करावे अशी मागणी मनसे आमदार आमदार राजू पाटील यांनी केली होती.
६. लातुर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव
लातूर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा संसर्ग आढळून येत असताना आता नवीन संकट समोर आलंय। लातुर जिल्ह्यात आजपर्यंत म्युकर मायकोसिसचे 7 रुग्ण आढळून आले आहेत। यामुळे लातुर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यापैकी दोन रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने एका रुग्णाला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर दुसऱ्या रुग्णाला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
७. पवनी तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात
सर्वसामान्य,गरिब यांचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या, तेंदूपत्ता हंगामाला महत्व आहे. याचं कारण म्हणजे, कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारा रोजगार म्हणून, तेंदूपत्ता संकलनाच्या कामाकडे पाहिले जाते. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भुयार, निष्ठी, वायगाव, शिरसाळा, वाही आदी गावालगत असलेल्या जंगल परिसरात, तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरवात झाल्याचे दृश्य आहे.
८. भरधाव टिप्परच्या धडकेत महिला ठार
भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने, एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणासह एक महिला गंभीर जखमी झाल्याची ही घटना, भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील रोहा येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पुष्पा जगन मते असे मृत महिलेचे नाव आहे. तर लाला केवलराम कनपटे आणि गोपिका बांडेबुचे अशी गंभिर जखमीची नावे आहेत. या अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
९. मुंबईकरांनी दर्शविली 'विमानवारी'ला नापसंती!
प्रवाशांची वर्दळ, विमानांची लगबग आणि सतत कानावर पडणाऱ्या सूचनांनी गजबजून जाणारे मुंबई विमानतळ सध्या चिरनिद्र अवस्थेत असल्यासारखे भासत आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईतील दैनंदिन प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने मुंबईकर विमानवारीला नापसंती दर्शवित आहेत की काय, अशी शंका विमान कंपन्यांकडून व्यक्त केली जात आहे.
१०. ‘तौत्के’ चक्रीवादळाचे महाराष्ट्रावर संकट
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
No comments
Post a Comment