Breaking News

1/breakingnews/recent

14 मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - इरफान-युसूफ पठाण यांना सलाम....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. इरफान-युसूफ पठाण यांना सलाम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा हातावर पोट असलेल्यांना हतबल केले आहे. त्यात पुन्हा एकदा इरफान व युसूफ हे पठाण बंधू मदतीला पुढे आले आहेत. दक्षिण दिल्ली आणि वडोदरा येथील कोरोनाबाधित कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याचं काम ते करत आहेत. मागच्या वर्षी या बंधूंनी जवळपास ९० हजार कुटुंबीयांच्या घरी रेशन पूरवण्याचं काम केलं आणि हे सर्व त्यांनी स्वखर्चातून करून दाखवले.

2. चितेवर अचानक उठून बसला मृतदेह
कोरोनाच्या थैमानात अनेक विचित्र किंवा अविश्वसनीय घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणांहून आधी मृत घोषित केलेले अनेक लोक ऐन चितेवर टाकल्यावर जिवंत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे गुरूवारी चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर ड़ॉक्टरांना बोलवण्यात आलं. 

3. शेतकरी आंदोलनामुळे काही गावं झालीत कोरोना हॉटस्पॉट
गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आंदोलकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

4. गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटकाच्या घरी जात नाही
सरकारची धोरणं जबाबदार असल्याचं सांगत सोशल नेटवर्किंगवरुन सरकावर निशाणा साधला जात आहे. मात्र याचदरम्यान केंद्र सरकारवर होत असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचेमाजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनीही उडी घेतली आहे.अभिनेते गजेंद्र चौहान यांनी म्हटले आहे.

5. कोरोना एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार
aki कीकडे नेत्यांची गोमूत्र, शेण लावण्याचा आणि योगा करण्याचे सल्ले देणारी वक्तव्ये थांबत नसताना असताना उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या कोरोना एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार या विधानामुळे सोशल मीडियावर लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

6. SP तेजस्वी सातपुतेंनी घातलं पीपीई कीट
 एका खासगी रुग्णालयातील आयसीयू उपचार घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या तब्येची विचारपूस करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पीपीई कीट परिधान करून त्या पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. 

7. कोरोना आणि बिहार सरकारमध्ये साम्य
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना परिस्थितीवरून निशाणा साधला आहे.कोरोना आणि बिहार सरकारमध्ये साम्य असल्याचं लालू प्रसाद यादव  यांनी म्हटलं आहे. तसेच . "कोरोना आणि बिहार सरकारमध्ये काही साम्य आहे. दोघेही जनतेच्या जीवासाठी घातक आहेत.

8. वीज पडून १८ हत्तींचा मृत्यू
आसामच्या नगाव जिल्ह्यातील जंगलात वीज कोसळून 18 हत्तींचा मृत्यू झाला आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन संरक्षक अमित सहाय यांनी सांगितले की, कठियाटोली रेंजच्या कुंडोली वन क्षेत्रात एका पहाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली.

9. दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कोविडमुळे साध्या पद्धतीनेच आंबा महोत्सव होणार आहे. मात्र, दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्याची आरास करुन आंबा महोत्सवाची जोरदार सुरुवात झाली आहे.

10. लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार
केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या दोन्ही डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत" असं म्हटलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *