14 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - जम्बो ऐवजी कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करा...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. खर्डा येथे श्री श्री रविशंकर जी गुरुजी यांचा वाढदिवस साजरा
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चे श्री श्री रविशंकर जी गुरुजी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिसा निमित्त खर्डा व परिसरातील आर्ट आँफ लिव्हिंग चे सदस्य यांनी आरोळे हाँस्पिटला जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या कडे कोविड सेंटरला मदत म्हणून १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे गोळ्या औषधाच्या स्वरूपात भेट देऊन सामाजिक बांधिलकी राखली आहे.
2. शेवगाव तालुक्यात पाळले जात आहेत खबरदारीचे उपाय
शेवगाव तालुक्यात कोरोणा बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शहराबरोबरच विविध खेडोपाडी कोरोना संक्रमण करीत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. ज्या गावात कोरोना रुग्ण आढळले आहेत तेथे अधिक कोरोना चाचणी घेण्यास सुरू केले आहेत. तसेच खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे.
३. देशी दारूचा काढा घेतल्याने कोरोनाचे रुग्ण बरे होतात या दाव्यापासून संबंधित डॉक्टरने तीनच दिवसात
केले आहे. 'कुणीही या पद्धतीने उपचार करू नये. त्यातून काही उद्भवल्यास आपण जबाबदार राहणार नाही', असा पवित्रा प्रशासनाच्या नोटीसीनंतर आता या डॉक्टरने घेतला आहे.
4. पढेगाव येथील युवकावर दाखल गुन्हे मागे घेण्याची ग्रामस्थांची मागणी
आता बातमी आहे श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथून कोरोनाने जनता त्रस्त झालेली आहे सध्याच्या महागाईच्या काळात नागरिकांना मदत करावी आणि मदत म्हणजे तरी काय लोकांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे यांसारख्या माफक मागणी नागरिक आता लोकप्रतिनिधींकडून करत आहेत अशीच एक मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकड़े एका तरुणाने केले.
5. राहाता बाजार समितीत 12302 कांदा गोण्यांची आवक
राहाता बाजार समितीत सोमवारी 12 हजार 302 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1500 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. कांदा नं.2 ला 650 ते 950 रुपये, कांदा क्रमांक 3 ला 300 ते 600 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 250 रुपये असा भाव मिळाला.
6. लॉकडाऊनची आर्थिक झळ बसल्याने तरुण व्यापार्याचे श्रीरामपुरात उपोषण
करोना महामारीमुळे गेल्या वर्षी फेब्रुवारी ते जुलैपर्यंत, तर यावर्षीही महिनाभरापासून सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आला. या कालावधीत व्यवसाय बंद राहिल्याने व्यापार्यांना आर्थिक झळ बसली आहे. मालही पडून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने विविध करांमध्ये, बँकेकडील कर्जाच्या व्याजात व वीज बिलात सवलत द्यावी, या मागणीसाठी येथील व्यापारी तथा स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अमित मुथा यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे.
7. दहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर
सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य विभागाचा उडालेला फज्जा बघुन नागरीकांनी जिकडेतिकडे लसीकरणासाठी रांगा लावल्या आहे. कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगांव बोलका येथे लसीकरणासाठी आलेल्या नागरीकांनी लावलेल्या रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम मात्र दैनंदिन धाब्यावर बसवला जात असल्याचे बघायला मिळत आहे,आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरीक ऐकत नाही.
8. जम्बो ऐवजी कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करा
शिर्डीत उभारण्यात येणार्या 4200 खाटांचे जम्बो कोविड सेंटरऐवजी या सेंटरचे विकेंद्रीकरण करून सध्या या तालुक्यात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये थोड्याफार प्रमाणात खाटांची संख्या वाढवावी. तसेच साईबाबा संस्थांनने या ठिकाणी मदत करावी, अशी मागणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
9. आत्मा मालिक रुग्णालयात कोरोना रुग्णांस विनामुल्य सल्ला
कोरोनाच्या वैश्विक महामारीने थैमान घातले असताना,अनेकांनी कोरोनाशी झुंज देत असताना आपले प्राणही गमावले आहे.अशातच कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक रुग्णालय संचालितव्दारा एव्हर हेल्दी रुग्णालयाने नुकतीच मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन केले असताना आता या रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ञ डॉ.अनिल शामराव माने कोरोनातुन सावरलेल्या रुग्णांस विनामुल्य सल्ला देणार आहे.
10. राहात्यात कोव्हॅक्सिन उपलब्ध होत नसल्याने दुसर्या डोसपासून नागरिक वंचित
ग्रामीण रुग्णालयातील कारभार भाजप कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर आज गुरूवारी लसीकरणात काही प्रमाणात ्सुसूत्रता दिसून आली. राज्य सरकारने 45 वयोगटापुढील नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याने गर्दीही अत्यल्प दिसून आली. मात्र कोव्हॅक्सिनच्या लसीचा तुटवडा जाणवत आहे.
No comments
Post a Comment