13 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - सर्वाधिक लसीकरण होऊनही या देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
१. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा
महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना स्थिती पाहता बिहार सरकारनं राज्यात २५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. पुढचे दहा दिवस लॉकडाउनचे निर्बंध लागू असतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
२. दिल्लीत करोना रुग्णसंख्येत घट
दिल्लीकरांना दिलासा देणारी बातमी आहे. दिल्लीत गेल्या १५ दिवसांत करोना रुग्णसंख्येत घट झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. १५ दिवसांपूर्वी दिल्लीत करोना रुग्ण वाढीचा दर ३५ टक्क्यांवर पोहोचला होता. आता करोना रुग्ण वाढीचा दर १४ टक्क्यांवर आला आहे.
३.‘यूपीएससी’ ने नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली!
देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालेलं आहे. दिवसेंदिवस मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
४. योगी सरकार मृतदेह नदीत टाकून देत आहे; खासदाराचा आरोप
उत्तर प्रदेशमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच राज्यामध्ये करोना मृतांची आकडेवारी सरकारकडून लपवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. गाजीपूर जिल्ह्यामध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारच्या करोना मृतांच्या आकडेवारीसंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.
५. कुंभमेळा कोरोनासाठी ठरला सुपर स्प्रेडर
उत्तराखंडमध्ये एप्रिल महिन्यात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. करोनामुळे यंदाचा कुंभमेळा हा महिन्याभरासाठी भरवण्यात आला होता. त्यानंतर कुंभमेळ्याच्या एप्रिल महिन्यामध्ये उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली आहे. १ एप्रिल ते ७ मे या कालावधीमध्ये उत्तराखंडच्या रुग्णसंख्यमध्ये तब्बल १ लाख ३० हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.
६. 54 जिल्हाधिकाऱ्यांशी नरेंद्र मोदी करणार चर्चा
करोनाने देशात थैमान घातले. शहरानंतर करोनाने ग्रामीण भागात देखील पाय पसरायला सुरवात केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. बैठकीत जिल्ह्यांमधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच लसीची प्रक्रिया वाढविण्याबाबत चर्चा होईल.
७. सर्वाधिक लसीकरण होऊनही या देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
जगात सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि कडक संचारबंदी कायम आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आलाय . मात्र, लसीकरणानंतरही कोरोना विषाणू बाधित रुग्णांत वाढ होत आहे.
८. तुटवडा कायम अन् गर्दीही..
करोना प्रतिबंधक लशीचा तुटवडा कायम राहिल्याने बुधवारीही मुंबईतील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली. मात्र नेहमीप्रमाणे याबाबत नागरिकांना कोणतीही कल्पना देण्यात न आल्याने या केंद्रांवर पहाटेपासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व नागरिकांना दुपापर्यंत थांबूनदेखील लशीशिवाय परतावे लागले.
९. इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प यशस्वी
राज्यातील प्राणवायू संकटावर मात करण्यासाठी साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू निर्मितीचा देशातील पहिला प्रयोगिक प्रकल्प मंगळवारी यशस्वी झाला.
१०. स्टीव्ह स्मिथ पुन्हा कर्णधार होण्यासाठी पाठिंबा
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने स्टीव्ह स्मिथला कर्णधार होण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. स्टीव्ह स्मिथ पुन्हा कर्णधार होण्यासाठी मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन, असे त्याने म्हटले आहे. २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध बॉल टेंपरिंगच्या घटनेनंतर स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरून काढून टाकले गेले होते. त्यानंतर टीम पेनला स्मिथच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली.
No comments
Post a Comment