Breaking News

1/breakingnews/recent

13 मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - येत्या काही महिन्यात कोवॅक्सिन लसीचं उत्पादन ६ ते ८ पटीने वाढणार!....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

\



TOP HEADLINES


1. देशात आतापर्यंत 17.70 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना लसीच्या डोसची संख्या 17.70 कोटींहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासांत 17.70 लाख लसीचे डोस देण्यात आले. जागतिक स्तरावर सध्या भारत सर्वात जलद वॅक्सिनेशन करणारा देश आहे. भारतात 17 कोटी लसीचे डोस 114 दिवसांमध्ये देण्यात आले आहे. 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षातील नेत्यांच पत्र
विरोधी पक्षातील 12 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवून मोफत व्यापक कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या पक्षांनी म्हटले आहे, की सर्व बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपये द्या, गरजूंना मोफत धान्य द्या. लाखो 'अन्नदात्याला' साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी नवीन कृषी कायदे रद्द करा.

3. 26 कोरोनाबाधितांचा मृत्यू, हायकोर्टामार्फत चौकशी करण्याची आरोग्यमंत्र्यांची मागणी
गोव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृत्यूतांडव पाहायला मिळालं. अवघ्या चार तासात 26 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या नेमक्या कारणाचा तपास करण्यासाठी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

4. देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यानी आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 25-25 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लीटर झाली आहे. 

5. देशात सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यात यावा
देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर हा 10 टक्क्याहून जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं मत इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलंय. 

6. येत्या काही महिन्यात कोवॅक्सिन लसीचं उत्पादन 6-7 पटीने वाढणार
भारतात कोरोना संसर्गाचा वेग आता काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र एक प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे की देशातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लस कशी मिळू शकेल. दरम्यान भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, सध्या मे-जूनपर्यंत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे उत्पादन दुपटीने वाढेल आणि जुलै ते ऑगस्ट दरम्यान त्याचे उत्पादन जवळपास 6 ते 7 पटीने वाढेल.

7. अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनामुळे 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू
कोरोनाच्या महामारीचा कहर देशात सुरु आहे, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांचं अपरिमित नुकसान होतंय. देशात अशा नुकसानीच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातलं ऐतिहासिक अलीगढ मुस्लीम विद्यापीठ या विद्यापीठातले तब्बल 26 प्राध्यापक 18 शिक्षकेतर कर्मचारी…एकाच विद्यापीठात अशा एकूण 44 जणांचा मृत्यू…तोही अवघ्या 20 दिवसांत…देशातल्या अत्यंत ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित अलीगढ मुस्लीम विद्यापीठातला हा प्रकार धक्कादायक आहे.

8. पंतप्रधान 20 मे रोजी दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मे रोजी कोरोनामुळे प्रभावित दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत करणार आहेत. मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या 54 जिल्हाधिकार्‍यांसोबत स्थितीचा आढावा घेणार आहेत. .

9. बिटकॉईन वापरण्याचा निर्णय टेस्लाकडून मागे
 टेस्लाच्या कार खरेदीसाठी आता बिटकॉईनचा वापर करता येणार नाही. टेस्लाने आपल्या कार खरेदीसाठी बिटकॉईनचा पर्याय दिला होता. आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला असून तशा प्रकारची घोषणा सीईओ इलॉन मस्क यांनी केली आहे. क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत मोजून त्याचा वापर आपण करत नसल्याचं इलॉन मस्क यांनी सांगितलंय.

10. रिक्षाचालकांना अनुदानासाठी अर्ज करण्याची गरज नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने नुकताच जाहीर केला आहे. मात्र, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षाचालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. परवानाधारक रिक्षचालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात 'पोर्टल' तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *