13 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - देवळालीच्या तरुणाचा संगमनेरच्या तरुणीवर शारीरिक अत्याचार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. नेवासा तालुक्यात लसीकरणाचा तीस हजाराचा टप्पा झाला पार
नेवासा तालुक्यात कोरोना लसीकरणाचा तीस हजाराचा टप्पा पार झाला आहे. आजपासून तालुक्यात केवळ दुसऱ्या डोस लाभार्थ्यांनाच तेही रॅपिड टेस्ट करूनच लास दिली जातीये. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रावरील गर्दीही कमी झालीये.
२. स्वतः कोव्हीड केंद्र उभारून फोटो काढावे
जामखेड येथील आरोळे कोव्हीड सेंटर हे शासकीय आहे. या सेंटरला केंद्र सरकार आणि राज्या सरकार मदत करतायत, असे असताना फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो लावणे गरजेचे आहे. परंतु रोहित पवार हे आपला स्वतः चा फोटो लावून प्रसिद्धी मिळवून आपली टिमकी वाजवत आहेत.
३. आमदार आशुतोष काळे यांनी घेतला विकासकामाचा आढावा
कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोरोना महामारीत देखील विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. या निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकासकामांसाठी आढावा घेण्यासाठी कोपरगाव येथे गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती, पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
४. राहाता बाजार समितीत 12 हजार गोणी कांद्याची आवक
राहाता बाजार समितीत काल मंगळवारी 12 हजार 28 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1400 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.कांदा नं. 2 ला 650 ते 950 रुपये, कांदा क्रमांक 3 ला 200 ते 600 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 250 रुपये असा भाव मिळाला.
५. शिर्डीत 10 हजार रुपयाची खंडणी मागितली
वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे फोन वरून 10,000 रुपये रोख रकमेची खंडणी मागितली व पैसे नाही दिले तर ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी करणारी बातमी प्रकाशित करण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६. देवळालीच्या तरुणाचा संगमनेरच्या तरुणीवर शारीरिक अत्याचार
नगर येथील एका मोठ्या खासगी रुग्णालयात नोकरी करणार्या एका 26 वर्षीय स्टाफ नर्सला फय्याज शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग अकरा महिने वारंवार शारिरीक अत्याचार केल्याची घटना राहुरी व नगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात घडली.
७. साडेचौदा लाख टन ऊस गाळप करून ‘ज्ञानेश्वर’ राज्यात चौथ्या स्थानी - नरेंद्र घुले
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा 47 वा गळीत हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत करोना महामारीच्या संकटावर मात करत शेतकी विभाग, कामगार, अधिकारी, ऊसतोड कामगार, मुकादम, संचालक मंडळ तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ज्ञानेश्वर कारखान्याने 214 गावचे कार्यक्षेत्रातील 14 लाख 51 हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून सहकारी कारखान्यामध्ये राज्यात 4 था क्रमांक पटकावला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली .
८. श्रीरामपुरात मनसेच्यावतीने मुंडन आंदोलन
नगर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींकडून करोनाग्रस्त रुग्णांना कुठल्याच प्रकारचे वैद्यकीय सेवेची पूर्तता होत नसल्याने अनेकांचे मृत्यू होत आहे.
९. कुकडीच्या पाण्याचे आवर्तन पुन्हा लांबणीवर
कुकडीच्या पाण्याच्या आवर्तनाच्या निर्णय 17 मे रोजी होणार आहे. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पाटबंधारे विभागाने वेळ मागितल्यामुळे आवर्तन धोक्यात आले असल्याचे अॅड. कैलास शेवाळे यांनी सांगितले. कुकडीचे आवर्तन पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या चार तालुक्यांना मृतसाठ्यामधून सोडू नये अशी याचिका जुन्नर तालुक्यातील औटी या शेतकर्याने मुंबई उच्च न्यायालयमध्ये दाखल केली होती.
१०. महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते
की भारतातील कोरोना गेला म्हणून .. पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. अहमदनगर इथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची त्यांनी पाहणी करून कार्यकर्ते, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून अडीअडचणींची माहिती घेतली.
No comments
Post a Comment